

ChatGPT's new animated GIF creation feature allows users to turn text prompts and personal photos into GIFs with adjustable playback speed and editable animation frames
esakal
ChatGPT वापरणाऱ्यांसाठी OpenAI एक नवीन आणि आकर्षक सुविधा आणत आहे. आतापर्यंत ChatGPT च्या माध्यमातून फोटो तयार करण्याची सुविधा उपलब्ध होती. आता वापरकर्त्यांना केवळ मजकूर लिहून किंवा स्वतःचा फोटो अपलोड करून ॲनिमेटेड GIF तयार करता येणार आहेत. या सुविधेमुळे स्थिर छायाचित्रांचे रूपांतर हालचाली असलेल्या छोट्या ॲनिमेशनमध्ये करता येईल. आनंद, राग, आश्चर्य यांसारख्या विविध भावना आणि हावभाव GIF च्या माध्यमातून व्यक्त करता येतील. त्यामुळे GIF तयार करणे आणि ते इतरांसोबत शेअर करणे अधिक सोपे होणार आहे.