

Donald Trump and US trade advisor Peter Navarro as artificial intelligence platforms like ChatGPT become part of global trade and policy debates involving India and China.
esakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात नवी योजना आखली आहे. यावेळी त्यांचे लक्ष आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि चॅटजीपीटी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आहे. त्यांनी या तंत्रज्ञानाच्या विकास आणि ऑपरेशनमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या खर्चाकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे लक्ष वेधले आणि असे म्हटले की भारत आणि चीन सारख्या देशांना अशा सेवांचा फायदा होत आहे.