Jio, Airtel चे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, दररोज मिळेल 3GB डेटा | Recharge Plans | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airtel-Jio

Jio, Airtel चे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, दररोज मिळेल 3GB डेटा

सध्या इंटरनेटचा वापर वाढल्याने प्रत्येकाला कमी किमतीत जास्त डेटा ऑफर करणारा डेटा प्लॅन हवा आहे. आज आपण असेच रिलायन्स जिओचे रिचार्ज प्लॅन्स आणि एअरटेल प्लॅन्स माहिती करुन घेणार जे 400 रुपयांपेक्षा कमी दरात दररोज 3GB डेटा देतात. दोन्ही प्लॅन 3 जीबी डेटा आणि 28 दिवसांची वैधता देतात पण दोन्ही प्लॅनमध्ये 49 रुपयांचा फरक आहे

Jio चा 349 रुपयांचा प्लॅन

हा Jio प्रीपेड प्लॅन वापरकर्त्याला 28 दिवसांच्या वैधतेसह प्रतिदिन 3 GB डेटा ऑफर करतो. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. याचा अर्थ हा Jio प्लान तुम्हाला एकूण 84 GB डेटा देईल. या Jio प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Jio Cinema, Jio Tv सह इतर Jio अॅप्सचा फ्री एक्सेस देखील दिला जातो.

हेही वाचा: महिंद्राची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; एका चार्जवर धावेल 140 किमी

Airtel चा 398 रुपयांचा प्लॅन

या Airtel च्या प्रीपेड प्लॅन मध्ये वापरकर्त्याला दररोज 3 GB डेटासह 28 दिवसांची वैधता मिळते. तसेच या Airtel प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS ऑफर केले जातात.

एअरटेलचा या प्लॅनमध्ये त्यांच्या वापरकर्त्यांना 30 दिवसांसाठी Amazon प्राइम व्हिडिओ मोबाइल एडीशन सबस्क्रिप्शन फ्री ट्रायल देखील देते, Apollo 24/7 Circle, Shaw Academy 3 महिन्यांसाठी फ्री कोर्स, FasTag वर रु. 100 कॅशबॅक, मोफत Hellotune आणि Wink Music चा लाभ देखील मिळेल.

हेही वाचा: लॉंच झाली देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार, पाहा किंमत

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top