Datsun Go Plus | देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार; देते 22 kmpl मायलेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cheapest 7 seater car datsun go plus see price

देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार; देते 22 kmpl मायलेज

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जर तुम्ही 5 लाख रुपयांच्या खाली 7 सीटर कार शोधत असाल, तर Datsun Go Plus ही भारतीय बाजारपेठेत तुमची पहिली पसंती असेल. ही भारतातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार असून त्याची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. आज आपण या कारच्या सर्व व्हेरियंट्सबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

भारतीय बाजारपेठेत ही कार दोन 0.8-लिटर आणि 1-लिटर इंजिन प्रकारात येते. त्याचे 0.8-लिटर इंजिन 5678 rpm वर 54 PS पॉवर आणि 4386 rpm वर 72 Nm टॉर्क निर्माण करते. त्याच वेळी, त्याचे 1-लिटर इंजिन 5500 rpm वर 68 PS पॉवर आणि 4250 rpm वर 91 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो.

Datsun Go Plusच्या सर्व व्हेरियंट्सच्या किमती

  • Datsun Go Plus D - 4,25,926 रुपये

  • Datsun Go Plus A - 5,17,276 रुपये

  • Datsun Go Plus A(O) - 5,74,116 रुपये

  • Datsun Go Plus T - 5,99,990 रुपये

  • Datsun Go Plus T(O) - 6,36,698 रुपये

  • Datsun Go Plus T CVT - 6,79,676 रुपये

  • T(O) CVT - 6,99,976 रुपये

हेही वाचा: Tata ची कोणती कार आहे बेस्ट? वाचा सर्व कार्सच्या किंमती-मायलेज

Datsun Go Plus चा व्हीलबेस 2450 mm आहे. त्याच वेळी, त्याचे ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आहे. त्याची लांबी 3995 मिमी तर रुंदी 1636 मिमी आणि उंची 1507 मिमी आहे.समोरील बाजूस, McPherson Strutसह त्याची लोवल ट्रान्सव्हर्स लिंक आहे. त्याच वेळी, त्याच्या मागील बाजूस ट्विस्ट बीम सस्पेंशनसह कॉइल स्प्रिंग देण्यात आले आहे. ब्रेकिंगचा विचार केल्यास, Datsun Go Plus मध्ये समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक दिले आहे. Datsun Go Plus ची किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरु होते तर या कारचे टॉप एंड व्हेरियंटव 6.99 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीचा दावा आहे की ते 22 kmpl पर्यंत मायलेज देते.

हेही वाचा: मारुतीची नवीन Brezza; सनरूफ, नव्या इंटीरियरसह मिळतील अनेक फीचर्स

loading image
go to top