Tata ची कोणती कार आहे बेस्ट? वाचा सर्व कार्सच्या किंमती-मायलेज | Best Mileage Tata Cars | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Punch

Tata ची कोणती कार आहे बेस्ट? वाचा सर्व कार्सच्या किंमती-मायलेज

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी Tata Motors च्या कारची बंपर विक्री होत आहे, ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांचा या स्वदेशी कंपनीवर विश्वास आहे. तसेच टाटाच्या गाड्या लुक आणि फीचर्स तसेच सुरक्षेच्या बाबतीत जबरदस्त आहेत. मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा कार 25 KMPL पर्यंत मायलेज देतात.

जर तुम्ही टाटाची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आपण अलीकडेच लॉंच झालेल्या टाटा पंच (Tata Punch) आणि कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार टाटा नेक्सॉन तसेच Tata Altroz, Tata Tiago, Tata Tiago NRG, Tata Tigor, Tata Safari, Tata Harrier सारख्या टाटाच्या लोकप्रिय कारच्या किंमती आणि मायलेजबद्दल जाणून घेणार आहोत.

सर्वाधिक मायलेज देणारी हॅचबॅक कार

टाटा कारचे मायलेज आणि किंमत याबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या मायक्रो एसयूव्ही टाटा पंचची किंमत 5.49 लाख ते 9.39 लाख रुपये दरम्यान आहे. टाटा पंचचे मायलेज 19 kmpl असल्याचा दावा केला जात आहे. त्याच वेळी, टाटाच्या प्रीमियम हॅचबॅक Tata Altroz ​​ची किंमत 5.84 लाख ते 9.59 लाख रुपये पर्यंत आहे. Tata Altroz ​​बद्दल, कंपनीचा दावा आहे की त्याचे मायलेज 25kmpl पर्यंत आहे.

हेही वाचा: देशातील टॉप तीन इलेक्ट्रीक कार; 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स

टाटाच्या स्वस्त-महाग कार

टाटाच्या बजेट हॅचबॅक कार टाटा टियागोची किंमत 5 लाख ते 7.05 लाख रुपये आहे आणि तिच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ती एका लिटरमध्ये 24 किमी पर्यंत चालू शकते. टाटाची सर्वाधिक विक्री होणारी कार मध्यम आकाराची SUV Tata Nexon ची किंमत रु. 7.29 लाख ते रु. 13.24 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे आणि तिचे मायलेज 22 kmpl पर्यंत आहे. Tata Tiago NRG ची किंमत 6.57 लाख ते 7.09 लाख रुपये पर्यंत आहे आणि कंपनीचा दावा आहे की त्याचे मायलेज 20kmpl पर्यंत आहे.

हेही वाचा: मारुतीची नवीन Brezza; सनरूफ, नव्या इंटीरियरसह मिळतील अनेक फीचर्स

Tata Harrier आणि Safari ची किंमत, मायलेज

कंपनीची सेडान कार Tata Tigor ची किंमत 5.65 लाख ते 7.82 लाखांच्या दरम्यान असून कंपनीच्या दाव्यानुसार, तिचे मायलेज 20 kmpl पर्यंत आहे. Tata Harrier ची किंमत 14.39 लाख ते 21.09 लाख आहे आणि कंपनीच्या दाव्यानुसार, तिचे मायलेज 16 kmpl आहे. SUV सेगमेंटमध्येच, Tata Safari ची किंमत 14.99 लाख ते 23.18 लाख आहे आणि ती 16 kmpl पर्यंत मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे.

loading image
go to top