cheapest electric scooter ola s1 launched in india priced at check price range here
cheapest electric scooter ola s1 launched in india priced at check price range here

OLA ने लॉंच केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, एका चार्जवर चालते 131 Km

ओला इलेक्ट्रिकने भारतीय बाजारपेठेत ओला एस1 इलेक्ट्रिक स्कूटर 99,999 रुपये किमतीत लॉन्च केली आहे. याशिवाय कंपनीने स्कूटरच्या नवीन मॉडेलसाठी 499 रुपये किमतीत बुकिंग सुरू केले आहे. ग्राहक 2 सप्टेंबरपासून स्कूटर खरेदी करू शकतात. नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचा बेस हा Ola S1 सारखाच आहे. दरम्यान Ola S1 Pro भारतीय बाजारात आधीच विक्रीसाठी उपलब्ध आहे.

डिझाइनच्या बाबतीत, Ola S1 ही S1 Pro सारखाच दिसते आणि त्याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro जेट ब्लॅक, लिक्विड सिल्व्हर, पोर्सिलेन व्हाइट आणि निओ मिंट या चार रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.

स्कूटरच्या फीचर्स आणि टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचे झाले तर ते सर्व Ola S1 Pro सारखेच आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन सिस्टीम आणि बरेच काही यासारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, याला तेच Move OS सॉफ्टवेअर मिळते जे Move OS 3 वर अपडेट केले जाऊ शकते. जे कंपनीने दिवाळीला लॉन्च करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय स्कूटरच्या फास्ट चार्जिंगसाठी आणखी हायपर चार्जर सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

cheapest electric scooter ola s1 launched in india priced at check price range here
Airtel चे दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन; मिळेल 135GB पर्यंत डेटा, फ्री कॉलिंग

बॅटरी आणि स्कूटरची रेंज

पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात 3 KWh बॅटरी दिली आहे, जी एका चार्जवर 131 किमीची रेंज (एका चार्जमध्ये धावण्याची क्षमता) देते. Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरला तीन राइडिंग मोड मिळतात, ज्यात इको मोड, नॉर्मल मोड आणि स्पोर्ट्स मोड समाविष्ट आहे. स्कूटर इको मोडमध्ये 128 किमी, नॉर्मल मोडमध्ये 101 किमी आणि स्पोर्ट्स मोडमध्ये 90 किमीची रेंज देते.

cheapest electric scooter ola s1 launched in india priced at check price range here
Honda लवकरच भारतात लॉंच करणार पहिली इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या डिटेल्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com