देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; एका चार्जमध्ये चालेल 300Km

cheapest electric sedan car Tata Tigor EV with 306 range on single charge
cheapest electric sedan car Tata Tigor EV with 306 range on single charge Sakal

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) काही दिवसांपूर्वी 2021 टाटा टिगॉर ईव्ही (Tata Tigor EV) लाँच केली आहे. ही एक पावरफुल इलेक्ट्रिक सेडान आहे जी काही अपडेट्स आणि मोठ्या बदलांसह भारतात लाँच केली गेली आहे. या नव्या Tata Tigor EV मध्ये पूर्वीपेक्षा चांगले फीचर्स देण्यात आहेत तसेच या कारची रेंज देखील सुधारण्यात आली आहे, आता तुम्ही एका चार्जमध्ये ही कार तब्बल 306 किमी घेऊन जाऊ शकता.

कंपनीने या Tigor EV मध्ये Ziptron तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ज्यामुळे नवीन पॉवरट्रेन एक्स-प्रेस टी च्या तुलनेत या कारचा परफॉर्मंसमध्ये खुप सुधारणा झाली आहे. जर आपण किंमतीबद्दल बोलयचे झाले तर, Tata Tigor EV XE ची किंमत 11.99 लाख रुपये असून, Tata Tigor EV XM ची किंमत 12.49 लाख रुपये आणि Tata Tigor EV XZ+ ची किंमत 12.99 लाख रुपये असेल. जर तुम्ही या पॉवरफुल इलेक्ट्रिक सेडानचे सर्वात स्वस्त मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Tata Tigor EV XE हे तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. या कारची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरु होते.

ही कार तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये XM व्हेरियंटची किंमत 12,49,000 रुपये आहे. तर XZ+ ची किंमत ही 12,99,000 रुपयेआहे. टिगोर ईव्ही XZ+ व्हेरियंट ड्युअल टोन कलर स्कीममध्ये देण्यात आले आहे, ज्याची किंमत 13.14 लाख आहे. एवढेच नाही तर टाटा टिगोर ही देशातील सर्वात सुरक्षित सेडान आहे, या कारला ग्लोबल एनसीएपीने चार स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे. ही देशातील पहिली इलेक्ट्रिक कार आहे ज्यांची सेफ्टी टेस्ट करण्यात आली आहे.

cheapest electric sedan car Tata Tigor EV with 306 range on single charge
Tata आणि Maruti च्या या दोन नव्या CNG कार; देतील दमदार मायलेज

2021 Tata Tigor Electric ही कार 306 किलोमीटरची जबरदस्त रेंज देते. या कारमध्ये 55kW इलेक्ट्रिक मोटर आणि 26kWh लिथियम-आयन बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे. हे पॉवरट्रेन 74bhp (55kW) पॉवर आणि 170Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार फक्त 5.9 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग गाठू शकते असा कंपनीचा दावा आहे.

cheapest electric sedan car Tata Tigor EV with 306 range on single charge
पुढच्या महिन्यात येतेय Tata ची CNG कार; मिळेल जबरदस्त मायलेज

Tata Tigor EV IP67 रेटेड बॅटरी पॅकसह येते. कंपनी 8 वर्षे आणि 160000km बॅटरी आणि मोटर वॉरंटी देखील देते. यात इंपॅक्ट रेसिस्टंट बॅटरी पॅक केसिंग मिळते. Tigor इलेक्ट्रिक बॅटरी फास्ट चार्जिंग वापरून सुमारे 1 तासात 0 ते 80% पर्यंत आणि स्टँडर्ड होम चार्जर वापरून सुमारे 8.5 तासात चार्ज केली जाऊ शकते.

डिझाइनच्या बाबतीत, 2021 टाटा टिगोर इलेक्ट्रिकला सुधारित फ्रंट फेसिंग देण्यात आली आहे. समोर, प्रोजेक्टर हेडलॅम्प, खालच्या बम्परवर एलईडी डीआरएल (डे टाईम रनिंग लँप), एलईडी टेल-लॅम्प आणि ब्लॅक-आउट विंग मिरर देण्यात आले आहेत. ड्युअल फ्रंट एअरबॅग, EBD सह ABS, रियर व्ह्यू कॅमेरा, रियर पार्किंग सेन्सर इत्यादी स्टँडर्ड म्हणून येतील. केबिनच्या आत, टिगोर ईव्ही मध्ये ड्युअल-टोन ब्लॅक आणि बेज स्कीम, 7-इंच हरमन-सोर्स टचस्क्रीन देण्यात येते.

cheapest electric sedan car Tata Tigor EV with 306 range on single charge
Kia ने लॉंच केली सर्वात स्वस्त SUV ची स्पेशल एडिशन, पाहा किंमत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com