esakal | सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये BSNL ने मारली बाजी, एअरटेल आणि व्होडा-आयडिया मागे

बोलून बातमी शोधा

bsnl.jpg

सर्वात स्वस्त प्लॅन आणि त्यावर मिळणाऱ्या फायद्यामध्ये बीएसएनएलने एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाला मागे टाकले आहे.

सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये BSNL ने मारली बाजी, एअरटेल आणि व्होडा-आयडिया मागे
sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- सर्वात स्वस्त प्लॅन आणि त्यावर मिळणाऱ्या फायद्यामध्ये बीएसएनएलने एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाला मागे टाकले आहे. बीएसएनएलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन 18 रुपयांचा आहे. तर व्हॅलिडिटीबरोबर येणाऱ्या एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचा सर्वात स्वस्त प्लॅन 19 रुपयांचा आहे. बीएसएनएलने आपल्या 18 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केले आहेत. यामध्ये मिळणारे सर्व बेनिफिट्स वाढवण्यात आले आहेत. जाणून घेऊयात बीएसएनएलच्या 18 रुपयांच्या प्लॅनमध्ये आता काय-काय फायदे मिळत आहेत आणि कशापद्धतीने एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या प्लॅनपेक्षा चांगले आहेत. 

बीएसएनएलच्या 18 रुपयांच्या प्लॅनमधील खास फायदे

हेही वाचा- फक्त 10 मिनिटांत स्मार्टफोनचं चार्जिंग होणार फुल्ल; येतेय नवीन टेक्नॉलॉजी
बीएसएनएलच्या 18 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाऊचर (एसटीव्ही) सर्व सर्कल्ससाठी आहेत. या प्लॅनमध्ये केलेले बदल 5 फेब्रुवारी 2021 पासून लागू होतील. या प्लॅनमध्ये आता व्हॉइस कॉल्स, व्हिडिओ कॉल्स, डेटा आणि एसएमएस बेनिफिट्सचे कॉम्बो ऑफर मिळत आहेत. या बदलानंतर बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर ट्रूली अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगबरोबर व्हिडिओ कॉल्सचा फायदा मिळत आहे. या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा मिळेल. त्याचबरोबर 100 एसएमएस पाठवण्याची मुभाही असेल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 2 दिवसांची आहे. 

एअरटेलच्या 19 रुपयांच्या प्लॅनमध्ये कमी डेटा, एसएमएसची सुविधाही नाही
एअरटेलचा सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन 19 रुपयांचा आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटीही 2 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदाही मिळतो. परंतु, बीएसएनएलच्या 18 रुपयांच्या प्लॅनसोबत केवळ 200 एमबी डेटा मिळतो. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळत नाही. 

हेही वाचा- Valentine Week 2021: तुमच्या व्हॅलेंटाईनला मोबाईल गिफ्ट द्यायचाय? हे आहेत Best Option

व्होडाफोनच्या प्लॅनमध्ये कमी डेटा आणि एसएमएस बेनिफिटही नाही
व्होडाफोनचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन 19 रुपयांचा आहे. व्होडाफोन-आयडियाच्या (आता VI) या प्लॅनवर कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. परंतु, बीएसएनएलच्या 18 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत या प्लॅनमध्ये केवळ 200 एमबी डेटा मिळतो. त्याचबरोबर प्लॅनमध्ये एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळत नाही.