esakal | Amazon-Flipkart सेलमध्ये 'हे' आहेत सर्वात स्वस्त स्मार्टफोन; पाहा यादी
sakal

बोलून बातमी शोधा

Realme Narzo 50i

Amazon-Flipkart सेलमध्ये 'हे' आहेत सर्वात स्वस्त स्मार्टफोन

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) सध्या जबरदस्त सेल (Sale) सुरु आहे. या सेलमध्ये ग्राहकांना महागडे स्मार्टफोन बेस्ट ऑफर्स आणि डिस्काउंटमध्ये स्वस्तात मिळत आहेत. तुम्ही देखील जर कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये तुम्हाला त्यासाठी अनेक चांगले पर्याय मिळतील. या सेल मध्ये देण्यात येत असलेल्या काही अशाच काही बेस्ट स्मार्टफोन ऑप्शन्सबद्दल आपण जाणून घेणार आहेत, ज्यांच्या किंमती या पाच हजारांच्या जवळपास आहेत..

Karbonn X21

हा फोन मोठी सवलतीत सेलमध्ये देण्यात आली आहे. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 6,990 रुपयांऐवजी 5,299 रुपयांना खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफर अंतर्गत हा फोन घेतल्यास तुम्हाला 4,750 रुपयांपर्यंत अतिरिक्त लाभ मिळू शकतो. 2 जीबी रॅमसह फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

Lava Z2s

फ्लिपकार्ट सेलमध्ये या फोनच्या किंमतीत एक हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता तुम्ही हा स्मार्टफोन 6,999 रुपयांना खरेदी करू शकता. एक्सचेंज अंतर्गत, या फोनवर आणखी 6,450 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. हा फोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. फोटोग्राफीसाठी यात 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देखील दिला आहे.

Gionee Max

2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजसह हा फोन फ्लिपकार्टवर 5,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. याची मुळ किंमत 7,990 रुपये आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.1-इंच HD + डिस्प्ले आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Realme C21Y

बिग बिलियन डे सेल मध्ये बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. फोनची किंमत 10,999 रुपयांवरून 7,999 रुपय करण्यात आली आहे. बँक ऑफरसह, हा फोन तुम्हाला 7,199 रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येईल. फोनमध्ये 4GB रॅम आणि 5000mAh बॅटरीसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे.

हेही वाचा: 15 हजार रुपयांत खरेदी करु शकता 'हे' बेस्ट स्मार्टफोन, पाहा यादी

Realme Narzo 50i

फ्लिपकार्ट सेलमध्ये Realme Narzo 50iची किंमत 7,999 रुपयांवरून स्टार्टिंग प्राइस 6,999 रुपये करण्यात आली आहे. बँक ऑफर नंतर आपण हा फोन 6,299 रुपयांच्या किंमतीसह खरेदी करू शकता. या फोनमध्ये 5000mAH बॅटरीसह 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे.

Tecno Spark Go 2021

तुम्हाला अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये हा फोन 8,999 रुपयांऐवजी 7,299 रुपयांना खरेदी करता येईल. कूपन लागू केल्यानंतर, तुम्हाला या फोनवर आणखी 300 रुपयांची सूट मिळू शकते. फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आळे असून 5000mAh बॅटरीसह या फोनमध्ये 6.52 इंचाचा डिस्प्ले तुम्हाला मिळेल.

हेही वाचा: 5 ते 10 लाख रुपयांमध्ये पेट्रोल कार शोधताय? हे आहेत टॉप ऑप्शन

Redmi 9A

अ‍ॅमेझॉनच्या डील ऑफर द डे अंतर्गत Redmi 9A खरेदी करता येईल. या फोनची किंमत 8,499 रुपयांवरून 6,799 रुपये करण्यात आली आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी आणि मीडियाटेक हेलियो जी 25 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Tecno Spark 7

अ‍ॅमेझॉनवर या फोनची किंमत सध्या 8,999 रुपयांवरून 7,499 रुपयांवर आली आहे. यात 200 रुपयांच्या डिस्काउंट कूपनचाही समावेश आहे. फोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज यासोबतच 6000mAh बॅटरी देण्यात आली असून, या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देखील दिला आहे.

loading image
go to top