WhatsApp वरुन तपासा PNR स्टेट्स, रेल्वेशी निगडीत सर्व माहिती

सकाळ ऑनलाइन टीम
Thursday, 28 January 2021

आतापर्यंत रेल्वेची प्रत्येक माहिती घेण्यासाठी प्रवाशांना वेगवेगळ्या वेबसाइटचा वापर करावा लागत असत.

जर तुमच्या फोनमध्ये WhatsApp असेल तर तुम्हाला रेल्वेचे PNR Status आणि रेल्वेचे लाइव्ह स्टेट्स पाहण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही. कारण रेल्वेने WhatsAppच्या माध्यमातून माहिती पाठवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी युजर्सला Railofy च्या नव्या फिचर्सची मदत घ्यावी लागेल. हे फिचर रिअल टाइम पीएनआर स्टेट्स आणि रेल्वे प्रवासाची माहिती WhatsApp वर उपलब्ध होईल. त्याचबरोबर प्रवासाला लागणारा वेळ, पीएनआर स्टेट्स, रेल्वेला किती उशीर होणार आहे, स्टेशन अलर्टसारखी माहिती उपलब्ध केली जाईल. आतापर्यंत रेल्वेची प्रत्येक माहिती घेण्यासाठी प्रवाशांना वेगवेगळ्या वेबसाइटचा वापर करावा लागत असत. परंतु, आता Railofy च्या नव्या फिचर्समध्ये रेल्वेशी निगडीत प्रत्येक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. त्याचबरोबर या ऍपच्या माध्यमातून युजर्सला पुढे येणाऱ्या स्टेशनबाबतही माहिती मिळेल. 

जाणून घ्या कसा करायचा ऍपचा वापर

- सर्वात आधी युजरला आपले WhatsApp अपडेट करावे लागेल. अँड्राएड युजर Google Play Store वरुन अपडेट करु शकतात. तर iPhone युजर्सला Apple App Store वरुन WhatsApp अपडेट करावे लागेल. 

- त्यानंतर WhatsApp वर रेल्वे चौकशी नंबर '+91-9881193322' आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा लागेल. 

हेही वाचा- Parliament canteen: संसदेत जेवणाचे दर वाढले; 60 रुपयांची व्हेज थाळी आता 100 ला

- त्यानंतर व्हॉट्सअपवर जाऊन New Message बटनवर क्लिक करावे लागेल. पुन्हा कॉन्टॅक्ट लिस्ट उघडावी लागेल. त्यानंतर तुम्हाला Railofy कॉन्टॅक्ट निवडावा लागेल. मेसेज विंडोमध्ये 10 डिजिटचा पीएनआर नंबर नोंदवावा लागेल. 

- अशापद्धतीने तुमचा पीएनआर नंबर रेसवेपर्यंत पोहोचेल.

- त्यानंतर तुमच्याकडे WhatsApp वर रियल टाइम माहिती मिळेल.

Railofy वर मिळेल ही महत्त्वाची माहिती
रेलोफायच्या मदतीने तिकीट काढताना किंमतीची तुलना करुन प्रवासाच्या दुसऱ्या पर्यायाचीही माहिती घेता येऊ शकते. त्याचबरोबर प्रवासाला लागणाऱ्या वेळेचीही माहिती दिली जाते. 

हेही वाचा- 'ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचाराला अमित शहाच जबाबदार; गृहमंत्र्यांना बडतर्फ करा'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: check rail pnr status and rail live location other information on whatsapp