डिसेंबर 2021 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप 10 कार, पाहा यादी

 top 10 selling cars in december 2021
top 10 selling cars in december 2021sakal

top 10 selling cars in December 2021 : डिसेंबर २०२१ मध्येही मारुती सुझुकीचे कार बाजारात वर्चस्व कायम आहे. कंपनीने कार विक्रीत कमालीची कामगिरी केली आहे. मारुतीने हा कारनामा अशा वेळी केला आहे जेव्हा संपूर्ण कार उद्योग अनेक संकटांशी झुंजत आहे, ज्याचा देशभरातील कारच्या उत्पादनावर आणि वितरणावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, मारुती टाटा मोटर्सनंतर दुसरी अव्वल कार उत्पादक म्हणून उदयास आली आणि अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर दुसऱ्या स्थानावरुन Hyundai मोटरला मागे टाकले. गेल्या महिन्यात, डिसेंबर 2021 मध्ये भारतात विकल्या गेलेल्या टॉप 10 कारच्या यादीत, मारुतीचे 8 मॉडेल आहेत.

डिसेंबर 2021 मध्ये सर्वाधिक विकलेल्या टॉप 10 कार

मारुती वॅगनआर (WagonR)

डिसेंबर महिन्यात चिपच्या संकटानंतरही मारुतीची WagonR उत्कृष्ट कामगिरी करत आहे, टॉप 10 यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मारुतीने गेल्या महिन्यात वॅगनआरच्या 19,729 युनिट्सची विक्री केली, जी डिसेंबर 2020 मध्ये 17,684 युनिट्सची विक्री झाली होती. मारुतीने यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये WagonR च्या 16,853 युनिट्सची विक्री केली होती.

मारुती स्विफ्ट (Maruti Swift)

मारुतीची प्रीमियम हॅचबॅक स्विफ्ट या यादीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. मात्र डिसेंबर 2020 च्या तुलनेत विक्रीत घट झाली आहे. मारुतीने डिसेंबर 2021 मध्ये स्विफ्टच्या 15,661 युनिट्सची विक्री केली, डिसेंबर 2020 मध्ये 18,131 युनिट्सची विक्री झाली. मारुतीने स्विफ्टच्या 14,568 युनिट्सची विक्रीनंतर डिसेंबरच्या विक्रीचा आकडा नोव्हेंबरच्या तुलनेत किंचित सुधारला होता.

मारुती बलेनो (Maruti Baleno)

मारुती लवकरच प्रीमियम हॅचबॅक बलेनोची फेसलिफ्ट आवृत्ती आणणार आहे. मात्र सध्याचे मॉडेल विक्रीच्या बाबतीत मागे नाहीये गेल्या महिन्यात मारुतीने बलेनोच्या 14,458 युनिट्सची विक्री केली, तर नोव्हेंबरमध्ये केवळ 9,931 युनिट्सची विक्री झाली. डिसेंबर 2020 मध्ये, मारुतीने या प्रीमियम हॅचबॅकच्या 18,030 युनिट्सची विक्री केली.

टाटा नेक्सॉन Tata Nexon

डिसेंबर 2021 च्या विक्रीतील टाटाच्या यशाचे श्रेय त्याच्या सबकॉम्पॅक्ट SUV, Nexon ला दिले जाऊ शकते. टाटाने डिसेंबरमध्ये नेक्सॉनच्या 12.899 युनिट्सची विक्री केली, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. Nexon च्या विक्री कामगिरीने SUV या यादीत चौथ्या स्थानावर पोहचली आहे. टाटाने नोव्हेंबरमध्ये नेक्सॉनच्या 9,831 युनिट्स आणि डिसेंबर 2020 मध्ये फक्त 6,835 युनिट्स विकल्या.

 top 10 selling cars in december 2021
जिओचे 5 नवीन रिचार्ज प्लॅन, स्वस्तात मिळतोय 46GB पर्यंत डेटा

मारुती अर्टिगा (Maruti Ertiga)

मारुती एर्टिगाची दमदार कामगिरीही सुरूच आहे. मारुतीने गेल्या महिन्यात एर्टिगाच्या 11,840 युनिट्सची विक्री केली, गेल्या वर्षी याच महिन्यात 9,177 युनिट्सची विक्री झाली होती. यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये मारुतीने Ertiga च्या 8,752 युनिट्सची विक्री केली होती.

मारुती अल्टो (Maruti Alto)

डिसेंबरमधील टॉप 10 यादीत मारुती अल्टो काही प्रमाणात खाली आली आहे. गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये 11,170 युनिट्सच्या विक्रीसह, अल्टोने भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत सहाव्या क्रमांकावर स्थान मिळवले होते. डिसेंबर 2020 मध्ये मारुतीने विक्री केलेल्या 18,140 युनिटच्या तुलनेत अल्टोच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विकल्या गेलेल्या 13,812 युनिट्सपेक्षा हे खूपच कमी आहे.

मारुती डिझायर (Maruti Dzire)

टॉप 10 यादीत डिझायर ही एकमेव सबकॉम्पॅक्ट सेडान आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत विक्रीत लक्षणीय घट झाली असली तरी, डिझायरची त्याच्या श्रेणीतील कामगिरी अजूनही चांगली आहे. मारुतीने गेल्या महिन्यात डिझायरच्या 10,633 युनिट्सची विक्री केली होती, जी 2020 मध्ये याच महिन्यात 13,868 युनिट्स होती.

Hyundai Venue

या यादीत Hyundai Venue 8 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. Hyundai ने गेल्या महिन्यात 10,360 युनिट्सची विक्री केली, जी डिसेंबर 2020 मध्ये 12313 युनिट्स होती.

 top 10 selling cars in december 2021
दुर्दैवी! अपघातात पती-पत्नी जागीच ठार; २२ तारखेला होतं मुलाचं लग्न

Maruti Vitara Brezza

मारुतीच्या सब-कॉम्पॅक्ट SUV Brezza ला या वर्षाच्या अखेरीस नवीन फेसलिफ्ट मॉडेल मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र गेल्या महिन्यात 9,531 युनिट्स विकल्या गेल्याने अजूनही लोकांमध्ये ते पसंत केले जात आहे. मारुतीने डिसेंबर 2020 मध्ये ब्रेझाच्या 12,251 युनिट्सची विक्री केली, तर ब्रेझाने नोव्हेंबरमध्ये 10,760 युनिट्सची विक्री केली.

मारुती Eeco

मारुतीची युटिलिटी पॅसेंजर व्हॅन इको भारतात विकल्या जाणाऱ्या टॉप 10 कारच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे. डिसेंबर 2020 मध्ये विकल्या गेलेल्या 11,215 युनिट्सच्या तुलनेत मारुतीने Eeco च्या 9,165 युनिट्सची विक्री केली. नोव्हेंबरमध्ये मारुतीने Eeco च्या 9,571 युनिट्सची विक्री केली.

 top 10 selling cars in december 2021
Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com