चीनने घेतला बदला, जगात लोकप्रिय असलेल्या भारतीयाच्या क्लबहाऊसवर बंदी! असे आहे अॅप

टीम ई सकाळ
Friday, 12 February 2021

हे अॉडिओ चॅट बेस असलेले अॅप अमेरिकेत स्थायिक झालेल्या रोहन सेठ या भारतीयाने पॉल डेविडसनसोबत बनविले.

अहमदनगर ः भारतातील मोदी सरकारने चीनच्या किमान पन्नास अॅपवर बंदी घातली होती. आता हेच चिनी सरकार आपल्या भारतीयाने बनवलेल्या अॅपच्या मागे लागले आहे.

अमेरिकेच्या clubhouse (क्लब हाऊस)वर चीनने बंदी घातली आहे. हे अॉडिओ चॅट बेस असलेले अॅप अमेरिकेत स्थायिक झालेल्या रोहन सेठ या भारतीयाने पॉल डेविडसनसोबत बनविले. 
हे अॅप मार्च 2020 मध्ये Clubhouse हे अॅप लॉन्च झाले होते. जगातील लोकांच्या ते पसंतीसही उतरले होते. या clubhouse अॅपविषयी चीनमध्ये मोठी चर्चा होती. 

Clubhouse या अॅपप्रमाणे Facebook आपले ऑडियो प्रॉडक्ट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Clubhouse हे iOS बेस्ड डिवाइस आहे. Facebook हे iOSसोबतच अॅंड्राइड बेस्ड डिवाइस अॅप आणणार आहे. कारण अशी सुविधा असलेल्या अॅपला जगात मोठी मागणी आहे. 

हेही वाचा - दिग्गज नेते बिनविरोध सुटले, कर्डिले अडकले

Clubhouse या अॅपचे  2020 मध्ये 1,500 यूजर होते. त्याची किंमत 100 मिलियन डॉलरच्या घरात होती. Elon Musk ने Clubhouse वर त्याचे चैटरूम खोलले होते. त्याने Valad Tenev चे सीईओ रॉबिनहुड यांच्यासोबत एक ऑडियो चैट केले होते. ते YouTube वरही शेयर केले होते. त्यानंतर Club house च्या यूजर्सची संख्या झपाट्याने वाढली होती. फेब्रुवारी 2021 पर्यंत Clubhouse चे 2 मिलियनवर युजर होते. सध्या clubhouse ची किंमत 1 बिलियन डॉलर झाली आहे.  

असे काम करतो Clubhouse 
गोपनीयता हे Clubhouse अॅपचे वैशिष्ट्य आहे. ऑडियो कन्वर्सेशन साठवून ठेवू शकत नाही. लाइव असेल तरच हे अॅप यूजरला ज्वाइन करता येते. दुसऱ्या यूजरने  इनविटेशन पाठवले असेल तरच. चीनी यूजर्सला ज्वॉइन करण्यासाठी अमेरिकी अॅप स्टोरवर जावे लागते. तेथे फोन नंबर रजिस्टर केला तरच इनवाइट घेतो. जुना युजर असेल तर तो दुसऱ्याला दोनच आमंत्रण पाठवू शकतो. 

असे वापरा क्लब हाऊस 
clubhouse ज्वाइन करण्यासाठी युजरचे नाव आणि मोबाईल नंबर द्यावा लागतो. आमंत्रण मिळण्यापूर्वी यूजर नेम बदलू शकता. क्लबहाउसकडून एक मेसेज येतो. ते क्लबहाऊसचे आमंत्रण असेल. त्यानंतर मोबाइल नंबरवरून अॅपवर साइन-इन करू शकता. क्लबहाउसवर लॉगिन केल्यावर तुम्ही क्लबहाऊसवरील व्यक्ती किंवा खास टॉपिकला फॉलो करू शकता. क्लब हाऊसवर सुरू असलेल्या गप्पा तु्म्ही ऐकू शकता. तेथील मित्रांना तुम्ही फॉलो करू शकता. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China bans Indian youth clubhouse app