
Christmas 2022: प्रियजनांना स्मार्टफोन गिफ्ट द्या अन् ख्रिसमस बनवा खास, पाहा 'हे' बेस्ट डिव्हाइस
Best Smartphones To Gift This Christmas: ख्रिसमस, नववर्षाच्या निमित्ताने मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना गिफ्ट देण्याची अनेकांची योजना असते. मात्र, अनेकदा कोणते गिफ्ट घ्यावे हे सुचत नाही. तुम्ही देखील जोडीदार अथवा मित्र-मैत्रिणींसाठी गिफ्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर स्मार्टफोन चांगला पर्याय ठरू शकतो. बाजारात १० हजारांच्या बजेटमध्ये येणारे काही चांगले फोन्स उपलब्ध आहेत. कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणाऱ्या या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: Smartphone Offer: बंपर डिस्काउंट! Flipkart Sale मध्ये महागडे स्मार्टफोन्स मिळतायत स्वस्तात, ऑफर एकदा पाहाच

Realme 5i
Realme 5i
रियलमीच्या या फोनची किंमत फक्त ९,५९७ रुपये आहे. या फोनमध्ये तुम्हाला ६.५२ इंच डिस्प्ले, ४ जीबी + ६४ जीबी स्टोरेज, ५००० एमएएचची दमदार बॅटरी आणि १२ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. फोन Qualcomm SDM665 Snapdragon 665 Octa core प्रोसेसरसह येतो.
Oppo A12
ओप्पो ए१२ स्मार्टफोनमध्ये ६.२२ इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१५६० पिक्सल आहे. यात ऑक्टा-कोर प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. फोन अँड्राइड ९ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ओप्पोच्या या डिव्हाइसला तुम्ही अॅमेझॉनवरून ९,४९० रुपयात खरेदी करू शकता.
हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Poco C3
Poco C3
पोकोचा हा स्मार्टफोन फक्त ६,७९० रुपयात उपलब्ध आहे. यात ६.४३ इंच IPS LCD याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. यामध्ये ३ जीबी रॅम मिळेल. फोन अँड्राइड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.
Redmi 8A Dual Smartphone
रेडमीच्या या स्मार्टफोन ६.२२ इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले, २ जीबी + ३२ जीबी स्टोरेज, ५००० एमएएच बॅटरी, १३ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोन फक्त ९,६९० रुपयात उपलब्ध आहे.
Micromax in 1b
मायक्रोमॅक्सच्या या फोनसाठी तुम्हाला ८,४९८ रुपये खर्च करावे लागतील. फोनमध्ये ६.५२ आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला असून, याचे पिक्सल रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. फोन अँड्राइड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल.
हेही वाचा: Best Hatchback Cars: छोट्या कुटुंबासाठी बेस्ट आहेत 'या' कार, माइलेज जबरदस्त; किंमत ३ लाखांपासून सुरू