छोट्या कुटुंबासाठी बेस्ट आहेत 'या' कार, माइलेज जबरदस्त; किंमत ३ लाखांपासून सुरू | Best Hatchback Cars | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best Hatchback Cars

Best Hatchback Cars: छोट्या कुटुंबासाठी बेस्ट आहेत 'या' कार, माइलेज जबरदस्त; किंमत ३ लाखांपासून सुरू

Best Hatchback Cars in India: कार खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु, जास्त किंमतीमुळे अनेकजण खरेदी करणे टाळतात. मात्र, बाजारात कमी किंमतीत येणाऱ्या अनेक चांगल्या कार्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या स्वस्त कार्समध्ये अनेक शानदार सेफ्टी फीचर्स देखील दिले आहेत. छोट्या कुटुंबासाठी या कार्स चांगला पर्याय आहेत. या हॅचबॅक कारची सुरुवाती किंमत ३.३९ लाख रुपयांपासून सुरू होते. छोट्या कुटुंबासाठी बेस्ट असलेल्या ४ कारविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा: Recharge Plan: कमालच झाली! Jio अवघ्या १ रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे हाय-स्पीड डेटा, जाणून घ्या भन्नाट ऑफर

Maruti Suzuki Alto

Maruti Suzuki Alto

Maruti Suzuki Alto

Maruti Suzuki Alto मध्ये ०.८ लीटरचे ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. CNG मोडवर हे इंजिन ४१ पीएस पॉवर आणि ६० एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये ७ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आली असून, याद्वारे अँड्राइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेशी कनेक्ट करू शकता. तसेच, ड्राइव्हर साइड एअरबॅग, रियर पार्किंग सेंसर्स, ABS सह EBD सारखे फीचर्स मिळतील. कारची सुरुवाती किंमत ३.३९ लाख रुपये आहे.

Maruti Suzuki S-Presso

या कारमध्ये ९९८cc इंजिन देण्यात आले आहे, जे ५८.३३ बीएचपी पॉवर आणि ७८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन मॅन्यूअल ट्रान्समिशनसह येते. कारमध्ये मल्टी फंक्शन स्टेअरिंग व्हील, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीटवर ड्यूल एअरबॅग्स, पावर स्टेअरिंग, एअर कंडिशनर सारखे फीचर्स मिळतील. Maruti Suzuki S-Presso ची सुरुवाती किंमत ४.२५ लाख रुपये आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Maruti Suzuki Celerio

Maruti Suzuki Celerio

Maruti Suzuki Celerio

Celerio मध्ये K10C ड्यूलजेट १.० लीटर थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ६६ एचपी पॉवर आणि ८९ एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन ५-स्पीड मॅन्यूअल आणि ५-स्पीड AMT गिअरबॉक्ससह येते. यात ड्यूल एअरबॅग्स, ABS सह EBD, हिल होल्ड असिस्ट (फर्स्ट-इन सेगमेंट) सोबत एकूण १२ सेफ्टी फीचर्स मिळतील. कारला ५.२५ लाख रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता.

Tata Tiago

Tata च्या या हॅचबॅकमध्ये १.२ लीटर रेव्होट्रॉन इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन ८४ बीएचपी पॉवर आणि ११५ एनएम टॉर्क जनरेट करते. क्रॅश टेस्टमध्ये कारला ४ स्टार रेटिंग मिळाले आहे. यात १५ इंच एलॉय व्हील, वाइपरसह रियर डिफॉगर, अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्राइड ऑटो सपोर्टसह येणारी ७ इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टम, ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल आणि कूल्ड ग्लवबॉक्स सारखे फीचर्स मिळतील. कारची सुरुवाती किंमत ५.४४ लाख रुपये आहे.

हेही वाचा: Christmas Stickers: हटके WhatsApp स्टिकर्सद्वारे मित्र-मैत्रिणींना द्या ख्रिसमसच्या शुभेच्छा, पाहा प्रोसेस