क्‍लिनिंग ऍप्सची कितपत गरज? 

सतीश जाधव 
गुरुवार, 20 एप्रिल 2017

अनेक जण रॅम क्‍लिनिंग ऍप्सचा आधार घेतात. क्‍लीन मास्टरसारखी अनेक ऍप्स सध्या रॅम क्‍लिनिंगसाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. पण अशा प्रकारच्या थर्ड पार्टी ऍप्समुळे स्मार्टफोनला धोका पोचण्याचीच जास्त शक्‍यता असते, असा दावा तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अँड्रॉईडपिट डॉट कॉमने केला आहे. 

अनेक जण रॅम क्‍लिनिंग ऍप्सचा आधार घेतात. क्‍लीन मास्टरसारखी अनेक ऍप्स सध्या रॅम क्‍लिनिंगसाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. पण अशा प्रकारच्या थर्ड पार्टी ऍप्समुळे स्मार्टफोनला धोका पोचण्याचीच जास्त शक्‍यता असते, असा दावा तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अँड्रॉईडपिट डॉट कॉमने केला आहे. 

स्मार्टफोनची रॅम किती आहे, यावर त्याचा परफॉर्मन्स आधारित असतो. पण अनेकदा बजेट कमी असल्यामुळे साधा स्मार्टफोन घ्यावा लागतो. अशा फोन्समध्ये रॅम कमी असते. परंतु तरीही स्मार्टफोनचा वापर करण्याचा, धडाधड ऍप्स ओपन करण्याचा-वापरण्याचा मोह टाळता येत नाही. अशा वेळी स्मार्टफोनचा वेग मंदावतो. त्यामुळे मग ऍप स्टोअरवर आज असंख्य थर्ड पार्टी रॅम बूस्टर (रॅमची क्षमता वाढविणारे) ऍप्स उपलब्ध आहेत. पण फायदेशीर वाटणारी ही ऍप्सच तुम्हाला धोक्‍यात आणू शकतात. उपकरणाची इंटर्नल मेमरी आणि बॅटरी लाइफ या गोष्टींसाठी ही ऍप्स धोकादायक ठरू शकतात. बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या इतर ऍप्सना बंद करणारी ही ऍप्स स्वतः मात्र बॅकग्राउंडमध्ये सतत चालूच राहतात. यामुळे स्मार्टफोनचा वेग मंदावतो. वास्तविक, अँड्रॉईड उपकरणे ही रॅम स्वतःहून मॅनेज करण्यासाठी सक्षम असतात. 

स्मार्टफोनच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेक जण स्मार्टफोनमध्ये कॉम्प्युटरप्रमाणे अँटिव्हायरस इन्स्टॉल करतात. पण अशा प्रकारचे थर्ड पार्टी अँटिव्हायरस इन्स्टॉल करण्याची काही गरज नसते. स्मार्टफोनमध्ये एपीके फाइल डाऊनलोड करताना हे अँटिव्हयरस काम करतात. पण प्रत्यक्षात हेच काम अँड्रॉईड डिव्हाइस मॅनेजरही कोणत्याही ऍक्‍टिव्हेशन शिवाय करू शकते. सेटिंग्जमधील अननोन सोर्सचा पर्यायदेखील एपीके फाइल्स डाऊनलोड न करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे या सर्व सुविधा व त्यांचे काम पाहता स्मार्टफोनला अँटिव्हायरसची गरज नाही, हे लक्षात येते. 
रॅम बूस्टरप्रमाणेच बॅटरी सेव्हर ऍप्सचीही चलती आहे. बॅटरी सेव्हर ऍप डाऊनलोड केल्यानंतर स्मार्टफोनची होम स्क्रीन व टोगल्स पूर्णतः बदलल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. तसेच यात स्मार्टफोनवर भार टाकणारे काही ऍनिमेशन्सही असल्याचे दिसते. या सर्व गोष्टींमुळे ही ऍप्स बॅटरी वाचविण्याऐवजी बॅटरी खाण्याचेच काम करतात. त्यामुळे अशा ऍप्सपासून स्मार्टफोनला दूरच ठेवा. तसेच चार्जिंग सुरू असताना फोनचा वापर टाळा. स्क्रीनचा ब्राइटनेसदेखील गरजेनुसार वापरा, त्यामुळेही बॅटरीची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकेल. 

रॅम बूस्ट करण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या क्‍लीन मास्टर ऍप्सचीही अनेक यूजर्सना मोहिनी असल्याचे दिसून येते. हे ऍप स्मार्टफोनमधील कॅचे फाइल्स डिलिट करून परफॉर्मन्स सुधारण्यास हातभार लावते. पण हे करत असताना या ऍपमध्येच अनेक कॅचे फाइल्स तयार होताना दिसतात. प्रत्यक्षात कॅचे फाइल्स मॅन्युअलीही डिलिट करता येतात. त्यासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही थर्ड पार्टी ऍपची गरज नसते. सेटिंग्जमध्ये जाऊन स्टोअरेजच्या पर्यायावर क्‍लिक करा. त्यानंतर तुम्हाला हवी ती ऍप्स सिलेक्‍ट करून त्यातील कॅचे फाइल्स डिलिट करता येतात. 

Web Title: clean master boost & app need