CNG Car : सीएनजीवर चालणाऱ्या मारुती कारसाठी आता 9 महिन्यांचं वेटिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CNG Car

CNG Car : सीएनजीवर चालणाऱ्या मारुती कारसाठी आता 9 महिन्यांचं वेटिंग..

CNG Car : सध्या पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे मध्यमवर्गीयांना कार घेणं किंबहुना चालवणं परवडण्यासारखं नाहीये. त्यामुळे लोक आता इतर पर्यायांच्या शोधात आहेत. त्यातल्या त्यात स्वस्त पर्याय म्हणून सीएनजवर चालणाऱ्या गाड्या पुढं येतायत. याच कारणामुळे गेल्या काही महिन्यांत सीएनजी कारची मागणी झपाट्याने वाढली आहे. पण याचा जास्त फायदा झालाय मारुती सुझुकीला.

हेही वाचा: CNG Car : कार खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! Baleno अन् XL6 चे CNG मॉडेल लाँच

म्हणजे झालंय असं की, मारुती सुझुकीने आपला CNG पोर्टफोलिओ आणखी मजबूत केलाय. मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमध्ये 10 पेक्षा जास्त CNG कार आहेत. अलीकडेच, कंपनीने Baleno CNG आणि XL6 CNG गाड्या लाँच केल्यात.

हेही वाचा: CNG Cars : CNG कार घेण्याचा विचार करताय? पहा हे भन्नाट ऑप्शन

अर्टिगाची डिमांड वाढलीय

पण या सगळ्यात भाव खाऊन गेलीय मारुती सुझुकी अर्टिगा. अर्टिगाच्या सीएनजी कारला सर्वात जास्त मागणी आहे. या वाढलेल्या मागणीमुळे अर्टिगाचा वेटिंग टाईम 9 महिन्यांपेक्षा जास्त झालाय. Maruti Suzuki च्या MPV Ertiga CNG (ZXi) मॉडेलची दिल्लीत एक्स-शोरूम प्राईस 11.60 लाख रुपये आहे. या मॉडेलची मागणी देशभरातच वाढलीय.

हेही वाचा: Best CNG Car: 'या' स्वस्त CNG कार देतात ३० पेक्षा जास्त मायलेज; किंमत देखील कमी

Ertiga चं नवीन मॉडेल या वर्षी एप्रिलमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. पण नंतर त्यात S-CNG हा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आला. सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे कंपनीच्या उत्पादनावर परिणाम झालाय हेही तितकंच खरं आहे.

हेही वाचा: Car Tyre : आता गाडीत हवा भरायची गरजचं नाही; आले खास टायर

वर्षा दर वर्षात विक्रीत वाढ

दरम्यान, मारुतीने ऑक्टोबर महिन्यातील विक्रीचे आकडे सादर केले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत मारुतीच्या पॅसेंजर वाहनांच्या विक्रीत 28.77% वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात कंपनीने एकूण 140,337 वाहनांची विक्री केली. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये कंपनीने 108,991 युनिट्सची विक्री केली होती.

हेही वाचा: Car Loan : ‘या’ बँकांमध्ये आहे सर्वात स्वस्त कार लोन

त्याच वेळी, एलसीव्ही प्रकारात 143,250 युनिट्सची विक्री झाली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये हा आकडा 112,788 युनिट्स इतका होता. गाड्यांची निर्यात आणि देशांतर्गत विक्री अशा दोन्ही गोष्टी मिळून कंपनीची एकूण विक्री 167,520 युनिट्स होती. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे ​​मार्केटिंग एंड सेल्सचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं की, सध्या सीएनजी कारसाठी सुमारे 1.23 लाख युनिट्सचं बुकिंग वेटिंगमध्ये आहे.