
कोरोना लसीकरणामध्ये मदतगार ठरणारे कोविन (Co-WIN) ऍप आपल्या लास्ट स्टेजमध्ये आहे.
नवी दिल्ली- कोरोना लसीकरणामध्ये मदतगार ठरणारे कोविन (Co-WIN) ऍप आपल्या लास्ट स्टेजमध्ये आहे. असे असले तरी याला गूगल प्ले स्टोर किंवा अन्य ऍप स्टोरवर उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. मंत्रालयाने सांगितल्यानुसार राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा डाटा गोळा केला जात आहे. या लोकांना फर्स्ट प्रायॉरिटी अंतर्गत कोविड-19 लस दिली जाणार आहे.
सोनू सूद अडचणीत, सहा मजली निवासी इमारतीला हॉटेलमध्ये रूपांतरित करण्याचा BMC चा...
कोविन ऍपवर अपलोड केला जातोय डाटा
फर्स्ट प्रायॉरिटी असणाऱ्या लोकांचा डाटा अपलोड केला जात आहे. को-विन ऍप डिजिटल प्लॅटफॉर्मवर फ्रीमध्ये डाऊनलोड केले जाऊ शकते. लसीकरणासंबंधी डाटा गोळा करण्यासाठी हे ऍप महत्वाचे ठरणार आहे. जर कोणत्या व्यक्तीला लस घ्यायची असेल, तर त्याला या अॅपवर रेजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या ऍपचे काय खास फिचर्स आहेत जाणून घेऊयात...
प्रत्येक युझर्संची तयार होणार यूनिक आयडी
कोविन ऍप लस घेणाऱ्या प्रत्येक यूझर्सची एक यूनिक आयडी जनरेट करेल. ऍपच्या माध्यमातून लस देण्याची वेळ आणि सेंटर्सची माहिती रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर मेजेस करुन देण्यात येईल. कोविन ऍपवर 12 भाषांमध्ये एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे.
अमेरिकेत समर्थकांच्या गोंधळानंतर ट्रम्प नरमले; म्हणाले, सत्तेच्या...
लस घेतल्यानंतर QR कोड होणार जनरेट
लसीकरणासंबंधी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून ऑथेंटिकेटेश केले जाणार आहे. लशीचे दोन्ही डोस मिळाल्यानंतर ऍपच्या माध्यमातून क्यूआर कोड जनरेट होईल. हा क्यूआर कोड सरकारच्या डिजी लॉकर ऍपवर सुरक्षित राहिल. लसीकरणानंतर काही दुष्परिणामाच्या घटना समोर आल्यास याला ट्रॅक करण्यात येईल.
24x7 हेल्पलाईनसह चॅट बॉटची सुविधा
कोविन ऍपवर 24x7 हेल्पलाईन सुविधा असेल. कोविन ऍपवर चॅट बॉटची सुविधा असेल. कोविन ऍपच्या आयडी बेस्ड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लसीकरणाशी जोडले गेलेल्या लोकांना ट्रेंनिग उपलब्ध करुन दिली जाईल. आतापर्यंत देशातील 700 पेक्षा अधिक जिल्ह्यातील 90 हजारांपेक्षा अधिक यूझर्संना ट्रेनिंग देण्यात आली आहे.