Study Tips l स्टडी शेड्यूल्ड करण्यासाठी वापरा 'या' खास टिप्स

केवळ प्लॅनिंगच नाही तर तुम्ही अभ्यासक्रम शेड्यूल देखील करू शकता.
Study Tips
Study Tips Esakal
Updated on

कोणतीही गोष्ट नियोजनपूर्वक (Planning)केल्यास यश नक्कीच मिळते. नियोजन कामाचे असो, दैनंदिन असो की, अभ्यासाचे. नियोजन करून कोणतेही काम केल्यास आपल्याला अडचणी येत नाहीत. यासाठी नियोजनाची सवय लावून घ्या. विशेषत: विद्यार्थ्यांनी (Student) नियोजनबध्द अभ्यासक्रम (Study) केला तर तुम्हाला परीक्षेच्या दरम्यान त्रास होणार नाही. यासाठी तुम्ही काही आॅनलाईन अॅप्लिकेशन्सची मदत घेऊ शकता. केवळ प्लॅनिंगच नाही तर तुम्ही अभ्यासक्रम शेड्यूल देखील करू शकता. यासाठी नेमकी कोणती अॅप्लिकेशन्स/ अॅप (Applications) वापरावी जाणून घेऊया.

Study Tips
कोल्हापूर : पहिल्याच पेपरला लागला कस

अॅपचा तुम्हाला कोणता फायदा होईल

विद्यार्थ्यांनी अशा पध्दतीने अभ्यासक्रम केला तर त्याचा निश्चितच फायदा होतो. यामुळे तुम्हाला असाइनमेंट, प्रोजेक्ट, चाचण्या इत्यादी शेड्यूल करता येतात. याचा यूजर इंटरफेस सोपा असल्याने तुम्ही सोबत काही नोस्ट्स ही शेड्यूल करू शकता. यामध्ये कलर कोडिंगचा वापर देखील करता येतो. मात्र, यामध्ये तुम्हाला तारखेनुसार सेमिस्टरचे कोर्सेस, असाइनमेंट इत्यादी जोडावे लागतील. मग त्या तारखेनुसार तुम्हाला अॅप आठवण करून देते.

पॉवर प्लॅनर (Power Planer)

पॉवर प्लॅनर अॅप हे इंटरफेस स्टडी शेड्यूल अॅप आहे. याचा वापर हायस्कूल, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तुमच्या सोईनुसार यात तुम्ही असाइनमेंट शेड्यूल करून ठेवू शकता. हे अॅप गुगल कॅलेंडरला जोडले आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला नियोजित वेळेनुसार आठवण करून देते. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून डाउनलोड करता येते.

ईजी स्टडी (Easy study)

या अॅपचाही तुम्हाला चांगला फायदा होवू शकतो. कारण यामध्ये तुम्हाला ज्या विषयांचा अभ्यास करायचा आहे तो अभ्यासक्रम यात अॅड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर उजळणी करायची असेल तरी देखील तसे अॅड करू शकता. तुम्ही शेड्यूल केलेल्या दिवशीचे नोटीफिकेशन मिळेल. एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केली की, ईझी स्टडी टाइमर सुरू होतो. तुम्ही किती वेळ अभ्यास केला हे देखील पाहू शकता. अँड्रॉइड आणि आयओएससाठी विनामूल्य डाउनलोड करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com