Cyber Crime
Cyber Crime esakal

Cyber Crime : 5G अपडेट करणं पडू शकतं महागात; वाया जाईल आयुष्यभराची पुंजी

सध्या युजर्सच्या फोन वर 5G अपडेटचा मेसेज येतो आहे

Cyber Crime : 5G ची वाट बघता आहात? आपल्याही फोन मध्ये 5G नेटवर्क मिळावं यासाठी प्रयत्नही करत असाल, पण 5G अपडेट करतांना तुम्ही तुमचा बँक बॅलेंस गमावू शकतात.

Cyber Crime
Cyber Crime News : अश्लिल Vedio Callच्या बळावर उकळली खंडणी

5G लाँच होणार हे कळल्या पासून सगळेच 5G ची वाट बघत होते; अखेर 1 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद मोदींनी 5G सेवा सुरू झाल्याचं जाहीर केलं. देशातल्या 8 ते 10 शहरांमध्ये ही सेवा सुरू केली आहे. आता अनेक युजर्स आपलं नेटवर्क अपडेट करण्याच्या मार्गावर असतील; पण या सगळ्यात हॅकर्स चा सुद्धा फायदा होऊ शकतो.

Cyber Crime
Cyber Crime : सायबरबुलिंगचा वाढता विळखा

सध्या युजर्सच्या फोन वर 5G अपडेटचा मेसेज येतो आहे; या मेसेज वर तुम्हाला अपडेट साठी OTP मागितला जातो आहे आणि हा देताच हॅकर्स तर्फे बँकेतून पैसे कट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रने याबाबत महत्त्वाचा अलर्ट जाहीर केला आहे. तुम्हाला 5G अपडेट करण्यासाठी जर कुणी मेसेज किंवा फोन केला तर त्याला कोणतीही माहिती देऊ नका.

Cyber Crime
Cyber Crime : महिला वकिलासह गृहिणीच्या खात्यात सायबर गुन्हेगारांचा डाका

तुमच्या खात्यावरही हॅकर्सचा डोळा असू शकतो. KYC आणि वीजबिला नंतर आता 5Gचा नवा फंडा घेऊन हॅकर्स तुमच्या खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्ही खूप सावध राहाणं गरजेचं आहे.

Cyber Crime
Cyber crime : मोह, अज्ञान अन्‌ घाईच संकटात नेई

याबाबत बँकेनं ग्राहकांना आपल्या ट्विटर अकाऊंट द्वारे सांगितलं की कोणत्याही व्यक्तीला तुमचा OTP, बँक खात्याचे डिटेल्स किंवा आधार कार्ड पॅन कार्डची माहिती देऊ नका. चुकूनही थर्ड पार्टी अॅप, एनी डेस्क सारखे अॅप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करू नका. त्यामुळे तुमच्या फोनमधून महत्त्वाचा डेटा चोरला जाऊ शकतो. 5G संदर्भात जर तुम्हाला कोणताही अलर्ट, फोन किंवा SMS आला तर तुमची कोणतीही माहिती शेअर करू नका.

Cyber Crime
Cyber crime : मोह, अज्ञान अन्‌ घाईच संकटात नेई

5G अपडेट करायचं असेल तर तुम्ही सिमकार्ड कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊनच अपडेट करा. कोणत्याही थर्डपार्टी अॅपचा किंवा अशा SMS च्या मदतीने करू नका. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com