Cyber Fraud Tips : तुम्हीही सायबर फसवणुकीला बळी पडला आहात ? सायबर फसवणुक टाळण्यासाठी सरकारने सांगितले उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Fraud Tips

Cyber Fraud Tips : तुम्हीही सायबर फसवणुकीला बळी पडला आहात ? सायबर फसवणुक टाळण्यासाठी सरकारने सांगितले उपाय

Cyber Fraud Tips : आजकाल सायबर गुन्ह्यांच्या घटना खूप वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आपल्या सापळ्यात अडकवतात. मागच्या काही दिवसांत सायबर ठगांनी लोकांची फसवणूक करून त्यांची बँक खाती रिकामी केली आहेत . या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सायबर फसवणूक टाळण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर मोहीम सुरू केली आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ टाकला असून यात सायबर फसवणूक टाळण्याचे मार्ग सांगण्यात आले आहेत.

केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांनी जागो ग्राहक, जागो मोहिमेसह सायबर फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना सांगितल्या आहेत. ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये, सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक कशी करतात आणि त्यांची बँक खाती कशा पद्धतीने रिकामी करतात हे सांगितलंय.

अशाप्रकारे होते सायबर फसवणूक..

कॅबिनेट मंत्र्यानी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलंय की, सायबर गुन्हेगार युजर्सना एसएमएस पाठवतात ज्यामध्ये त्यांना कर्जाची ऑफर दिली जाते. क्रेडिट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. युजर्स या भुल थापांना बळी पडून हे अॅप डाउनलोड करतात आणि येथून ते सायबर ठगांच्या जाळ्यात अडकू लागतात.

बँक खात्यातून रक्कम लंपास...

हे अॅप युजर्सना त्यांच्या बँक खात्याशी लिंक करावं लागतं असं. यानंतर बँक खात्याची माहिती सायबर ठगांपर्यंत पोहोचते. हॅकर्स या अॅपमध्ये त्यांचा UPI ID (UPI ID) जोडतात आणि युझर्सच्या बँक खात्यातील पैसे त्यांच्या UPI मध्ये ट्रान्सफर करतात. युजर्सना याची माहिती मिळण्यापूर्वीच हॅकर्स त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतात.

सायबर फ्रॉड टाळण्याचे उपाय..

पैशाचे आमिष देणाऱ्या ऑफर्सकडे लक्ष देऊ नका आणि असे कोणतेही अॅप डाउनलोड करू नका. तुमच्या बँक खात्याची माहिती कोणत्याही अज्ञात किंवा संशयास्पद अॅप/वेबसाइटशी शेअर करू नका. तुमची फसवणूक झाल्यास, ताबडतोब 1930 वर कॉल करा आणि बँकेला कळवा. याशिवाय, कार्ड ब्लॉक करा आणि सायबर क्राइम हेल्पलाइन cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा आणि पोलिसांकडे तक्रार करा. त्यामुळे फसवणुकीचे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.