Deepseek AI : डीपसीकची एंट्री अन् जगात धुमाकूळ! ChatGPT, Gemini पेक्षा वेगळं काय? फ्री AI मध्ये काय काय मिळणार

DeepSeek R1 AI मॉडेल, जे ChatGPT आणि Google Gemini च्या तुलनेत कमी किंमतीत उपलब्ध आहे. या नव्या मॉडेलमध्ये काय वेगळेपण आहे आणि कोणत्या सुविधा आहेत जाणून घ्या सविस्तर.
DeepSeek AI model how to use it
DeepSeek AI model how to use itesakal
Updated on

DeepSeek AI : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) क्षेत्रात DeepSeek R1 हे नाव चर्चेत आले आहे. चायनीज स्टार्टअप DeepSeek ने विकसित केलेला हा AI मॉडेल, OpenAI च्या ChatGPT आणि Google च्या Gemini ला थेट स्पर्धा देतो. DeepSeek R1 च्या लॉन्चनंतर अमेरिकन टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून, विशेषतः NVIDIA सारख्या AI चिप कंपन्यांवर परिणाम झाला आहे. DeepSeek R1 हा केवळ स्वस्त नाही, तर त्याच्या reasoning-based AI क्षमतांमुळे तो अन्य मॉडेल्सपेक्षा वेगळा ठरतो. त्यामुळेच हा AI मॉडेल संपूर्ण तंत्रज्ञान जगात चर्चेचा विषय बनला आहे.

DeepSeek R1 VS ChatGPT & Gemini काय फरक आहे?

DeepSeek ने R1 आणि R1 Zero हे दोन AI मॉडेल्स लॉन्च केले असून, हे दोन्ही ओपन-सोर्स तत्त्वावर आधारित आहेत. या मॉडेल्सचा वापर विनामूल्य करता येतो, त्यामुळे OpenAI, Google आणि Meta सारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

DeepSeek R1 हा Large Language Models (LLM) वर आधारित नसून, reasoning आणि cognitive thinking वर फोकस करणारा AI आहे.

DeepSeek AI model how to use it
DeepSeek AI : चीनच्या DeepSeek AI मॉडेलने जगात घातला धुमाकूळ; ChatGPT अन् NVIDIA ला दिलं चॅलेंज, फ्रीमध्ये सुविधा, नेमका विषय काय?
  • DeepSeek R1 चा खर्च इतर AI मॉडेल्सच्या तुलनेत खूपच कमी आहे.

  • 1 मिलियन इनपुट टोकन्ससाठी फक्त $0.55 (सुमारे ₹47)

  • 1 मिलियन आऊटपुट टोकन्ससाठी $2.19 (सुमारे ₹189)

  • तुलनेत, OpenAI आणि Google यांचे AI मॉडेल्स वापरण्यासाठी जास्त खर्च येतो.

  • DeepSeek R1 केवळ 2 महिन्यांत विकसित झाला, तर Google, Microsoft आणि Meta यांनी AI मध्ये वर्षानुवर्षे मोठी गुंतवणूक केली आहे.

  • Microsoft CEO सत्या नडेला यांनी DeepSeek R1 बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून, OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी देखील हा AI मॉडेल "Impressive" असल्याचे मान्य केले आहे.

DeepSeek AI model how to use it
Samsung 5G Mobile : यंदाच्या वर्षी सॅमसंग लाँच करणार परवडणाऱ्या दरातले 4 जबरदस्त 5G मोबाईल, तुम्ही कोणता खरेदी करणार?

ChatGPT आणि Gemini हे internet data वर आधारित उत्तर देतात, म्हणजेच ते जनरेटिव्ह AI आहेत. DeepSeek R1 हा reasoning AI आहे, जो cognitive क्षमता वापरून उत्तरे देतो. यामुळे भविष्यात तो अधिक अचूक आणि तर्कशुद्ध उत्तरं देऊ शकतो, ज्यामुळे AI क्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो.

DeepSeek AI model how to use it
Google Chrome Security Alert : तुमचं गुगल अकाऊंट आहे धोक्यात; मोदी सरकारने जारी केला अलर्ट, हॅकिंगचं प्रकरण आहे गंभीर

NVIDIA आणि Alibaba ला धक्का?

DeepSeek R1 च्या स्वस्त किंमतीमुळे आणि वेगळ्या कार्यपद्धतीमुळे अमेरिकन कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. NVIDIA सारख्या AI हार्डवेअर कंपन्यांचे शेअर्स खाली आले आहेत. Alibaba आणि Baidu सारख्या चायनीज कंपन्यांनी AI मध्ये अब्जावधींची गुंतवणूक केली आहे, परंतु DeepSeek R1 त्यांच्या AI मॉडेल्सना देखील आव्हान देत आहे.

DeepSeek R1 हा पारंपरिक LLM AI पेक्षा वेगळा असल्यामुळे भविष्यात AI मार्केटमध्ये मोठा बदल घडवू शकतो. जास्त अचूकता आणि स्वस्त किंमत यामुळे अनेक कंपन्या त्याचा अवलंब करू शकतात. जर OpenAI, Google आणि Microsoft यांनी आपल्या AI मॉडेल्समध्ये बदल केले नाहीत, तर DeepSeek R1 मोठी बाजारपेठ मिळवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com