दिल्ली मेट्रोत हाई-स्पीड इंटरनेट; 'या' स्टेशनवर मिळणार सुविधा

दिल्ली मेट्रो
दिल्ली मेट्रोGoogle

दिल्ली मेट्रोच्या यलो लाइनच्या सर्व स्टेशनवर आता मोफत हाई-स्पीड वाय-फाई इंटरनेचा वापर करता येणार आहे. डीएमआरसी ने रविवारी ही सुविधा सुरु केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली मेट्रो रेल निगम एक प्रोयोगिक संघासोबत मिळून मेट्रो (एयरपोर्ट एक्सप्रेस लाइन ला सोडून) रेल्वेत ही सुविधा लवकरच सुरु करणार आहे. दिल्लीकरांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. हुडा सिटी सेंटरपासून बादली पर्यत ३७ ठिकाणी ही सुविधा देण्यात आली आहे.

कोरोना काळानंतर तब्बल दिड वर्ष रेल्वे सुविधा बंद करण्यात आली होती. मात्र आता ही सेवा सुरू झालीय. शिवाय आता प्रवास करताना तुम्हाला हाई-स्पीड वाय-फाई वापरायला मिळणार आहे. यामुळे तुमचा प्रवास सुखकर होणार आहे. दिल्ली मेट्रो ने ही सुविधा २२.७ किलोमीटर लांब लाईनवर दिल्ली, शिवाजी स्टेडियम,धौला कुआं, दिल्ली एरोसिटी,आईजीआई एयरपोर्ट आणि द्वारका सेक्टर 21 सह सहा स्टेशनवर दिली आहे.

डीएमआरसी ने प्रायोगिक तत्वावर आपल्या एयरपोर्ट लाइनच्या रेल्वेमध्ये मोफत वाय-फाय सुविधा सुरु केली आहे. २०२० मध्ये कोविडकाळात ही सुविधा बंद केली होती. पुढच्या १० ते १५ दिवसात ही सुविधी सुरू होईल. असे एका ठिकाणी डीएमआरसी म्हटले आहे.

दिल्ली मेट्रो ने चांगला प्रवास होण्यासाठी आपल्या प्रवाशांसाठी येलो लाइन किंवा ट्रक लाईन २ वर समयपुर बादली ते हुडा सिटी सेंटर पर्यत सगळ्या मेट्रो स्टेशनवर फ्रि वाय-फाय सेवा सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अन्य स्टेशनवर ही नेटवर्क सुविधा देण्याचे काम सुरु आहे.

अशी मिळेल सुविधा

दिल्ली मेट्रो प्रवाशांसाठी “OUI DMRC FREE Wi-Fi” नेटवर्क वर लाॅगइन करा. यात तुमचा ई-मेल आणि मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. नियम व अटी भरून तुम्ही फ्रि वाय-फाय सेवेचा आनंद घेऊ शकता. फ्रि हाई-स्पीडच्या मदतीने ई-मेल, फेसबुक, गुगल सर्च, वॉट्सअप, व्हिडियो आणि ऑडियो कॉल्स करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com