6.47 कोटी खात्यांमध्ये PF व्याजाचे पैसे केले जमा; तुमचा बॅलेन्स तपासा | PF interest | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

6.47 कोटी खात्यांमध्ये PF व्याजाचे पैसे केले जमा; तुमचा बॅलेन्स तपासा

6.47 कोटी खात्यांमध्ये PF व्याजाचे पैसे केले जमा; तुमचा बॅलेन्स तपासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

PF Balance : मोदी सरकारच्या वतीने, EPFO ​​ने EPF सदस्यांच्या पीएफ खात्यात पैसे हस्तांतरित (Transfer) केले आहेत. ईपीएफओने सर्व पगारदार कर्मचाऱ्यांच्या खात्यात पीएफचे व्याज हस्तांतरित केले आहे. EPFO ने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली. आर्थिक वर्ष 2020-21 साठी PF खात्यावर 8.50 टक्के व्याज आले आहे. आतापर्यंत 6.47 कोटी खात्यांमध्ये व्याज खात्यात जमा करण्यात आल्याची.

मोदी सरकारच्या वतीने, EPFO ​​भविष्य निर्वाह निधी (PF) ग्राहकांच्या खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित केले आहेत. तुम्ही खालील मार्गांनी तुमची शिल्लक तपासू शकता.

हेही वाचा: बोकडांच्या मदतीने वीजनिर्मिती! दोन चिमुकल्यांचा आविष्कार

1. एसएमएसद्वारे तपासा

ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवा. LAN म्हणजे तुमची भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. मराठीत माहिती हवी असल्यास MAR लिहावे. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि तमिळसाठी TAM. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला EPFOHO UAN HIN लिहून मेसेज करावा लागेल.

2. मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या

तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमची ईपीएफ बॅलेन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल. ऑनलाइन कसे जाणून घेऊ शकता

हेही वाचा: घरबसल्या दुरुस्त करा 'आधार'मध्ये नाव व पत्ता! 'या' स्टेप्स करा फॉलो

3- वेबसाइटद्वारे

तुमची शिल्लक ऑनलाइन तपासण्यासाठी, EPF पासबुक पोर्टलला भेट द्या. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून या पोर्टलवर लॉग इन करा. यामध्ये, Download/View Passbook वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर पासबुक उघडेल ज्यामध्ये तुम्ही बॅलेन्स पाहू शकता.

4 - उमंग ॲपद्वारे

तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही हवे तेव्हा ॲपद्वारे तुमचा ईपीएफ बॅलेन्स तपासू शकता. यासाठी UMANG ॲप ओपन करा आणि EPFO ​​वर क्लिक करा. यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा आणि त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाका. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो टाकल्यानंतर, तुम्ही EPF बॅलेन्स पाहू शकता.

loading image
go to top