Car Offer: मस्तच! माइलेजमध्ये दमदार आहे मारुतीची लोकप्रिय कार, तब्बल ७५ हजारांच्या डिस्काउंटसह खरेदीची संधी

मारुती सुझुकीने ग्राहकांसाठी खास ऑफरची घोषणा केली आहे. ग्राहक डिसेंबर महिन्यात कंपनीच्या कारला स्वस्तात खरेदी करू शकतात.
Maruti Suzuki
Maruti SuzukiSakal

Maruti Suzuki S-PRESSO Car Offer: देशातील सर्वात मोठ्या कारनिर्माता कंपन्यांपैकी एक असलेली कंपनी मारुती सुझुकी डिसेंबर महिन्यात आपल्या गाड्यांवर बंपर डिस्काउंट देत आहे. नववर्षाच्या निमित्ताने स्वस्तात गाडी खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. कंपनी आपल्या एस-प्रेसो या मायक्रो-एसयूव्हीवर सर्वाधिक बंपर डिस्काउंट देत आहे. कंपनी कारच्या पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही व्हेरिएंटवर ऑफर देत आहे. तुम्हाला ४.२५ लाखांच्या कारला तब्बल ७५ हजार रुपये स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. कार एकूण ८ व्हेरिएंटमध्ये येते. याचे सीएनजी व्हेरिएंट ३२.७३ km/kg माइलेज देते. कारवरील ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

कारवर मिळेल ७५ हजार रुपये डिस्काउंट

मारुतीच्या एस-प्रेसोवर ७५ हजार रुपये डिस्काउंट मिळत आहे. याच्या पेट्रोल व्हेरिएंटवर कंपनी ६५ हजार रुपये डिस्काउंट देत आहे. यात ४५ हजार रुपये कॅश, १५ हजार रुपये एक्सचेंज आणि ५ हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. कारच्या सीएनजी व्हेरिएंटवर ७५ हजार रुपये डिस्काउंट मिळते. यात ६५ हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि १५ हजार रुपये एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. कारच्या LXi CNG व्हेरिएंटची किंमत ५.९० लाख रुपये आणि VXi CNG व्हेरिएंटची किंमत ६.१० लाख रुपये आहे.

Maruti Suzuki
ChatGPT AI: मनुष्याची जागा घेणार हे भन्नाट चॅटबॉट? सहज मिळेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर, वाचा काय आहे खास

जुलैमध्ये लाँच झाले आहे नवीन मॉडेल

कंपनीने कारच्या नवीन मॉडेलला जुलै २०२२ मध्ये लाँच केले आहे. या मॉडेलला नेक्स्ट जनरेशन के-सीरिज १.० लीटर ड्यूल जेट, ड्यूल VVT इंजिनसह लाँच करण्यात आले आहे. कारमध्ये आइडल स्टार्ट-स्टॉप टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आले आहे. न्यू एस-प्रेसोचे Vxi(O) आणि Vxi+(O) AGS व्हेरिएंट २५.३० Km/l, Vxi/Vxi+ MT २४.७६ km/l आणि Std/Lxi MT व्हेरिएंट २४.१२ km/l चे माइलेज देते. सर्व AGS व्हेरिएंटमध्ये ESP सह हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रिकली एडजेस्टेबल ORVMs देखील मिळेल.

एसयूव्हीमध्ये नेक्स्ट जनरेशन K-Series १.९ लीटर ड्यूल जेट, ड्यूल VVT इंजिन देण्यात आले आहे. हे ४९kW@5500rpm पॉवर आणि ८९Nm@3500rpm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन ५-स्पीड मॅन्यूअल आणि ५-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. नवीन एस-प्रेसोमध्ये कमांडिंग ड्राइव्ह व्ह्यू, डायनॅमिक सेंटर कंसोल, जास्त कॅबिन स्पेस आणि हाय-ग्राउंड क्लिअरेंससह शानदार एक्सटेरियर दिले आहे.

कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने देखील अनेक चांगले फीचर्स दिले आहेत. यात ड्यूल एअरबॅग्स, ABS सह EBD, प्री-टेन्शन अँड फोर्स लिमिटर फ्रंट सीट बेल्टसह फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, हाय स्पीड अलर्ट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेंसर, इलेक्ट्रॉनिक स्टेब्लिटी प्रोग्राम (ESP) आणि हिल होल्ड असिस्ट सारखे फीचर्स मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com