esakal | 15 सप्टेंबरला लॉंच होणार Dizo Watch 2 आणि Dizo Watch Pro, जाणून घ्या फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

Dizo Watch Pro

15 सप्टेंबरला लॉंच होणार Dizo Watch 2 आणि Dizo Watch Pro

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Dizo कंपनीने गेल्या महिन्यात भारतात त्यांची पहिली स्मार्टवॉच (Smart watch) डिझो वॉच लाँच केली होती. आता ही कंपनी 15 सप्टेंबर रोजी भारतात Dizo Watch 2 आणि Watch Pro लॉन्च करणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आगामी Watch Pro साठी एक लँडिंग पेज बनवण्यात आले आहे. या पेजवर खुलासा करण्यात आला आहे की, डिझो वॉच 2 मध्ये 1.69-इंचाचा ब्राइट टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. दरम्यान डिझो कंपनीने दावा केला आहे की, ही वॉच या प्राइस सेगमेंटमध्ये सर्वात मोठा डिस्प्ले असणारी वॉच आहे.

स्क्वेअर-आकाराच्या या स्मार्टवॉच मध्ये कस्टमायजेशनसाठी 100 पेक्षा जास्त वॉच फेस देण्यात आले आहेत. ज्यामध्ये एका वॉचसाठी मेटॅलिक फ्रेम असेल जी 5ATM वॉटर रेझिस्टन्स आहे. हार्ट रेट ट्रॅकर, एसपीओ 2 सेन्सर सारखी हेल्थ आणि फिटनेस मॉनिटरिंग फिचर्स देखील या घड्याळात देण्यात आली आहेत.

डिझोफ्लिपकार्टवर डिझो वॉच 2 लिस्ट करण्यात आले आहे त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 600nits ब्राइटनेस, 260mAh बॅटरी असेल. कंपनीचे म्हणणे आहे की, वॉचची बॅटरी एकाच चार्जवर 10 दिवस टिकेल. तसेच घड्याळ स्लीप ट्रॅकिंग, मासिक पाळी ट्रॅकिंग आणि 15 आउटडोअर आणि इनडोअर स्पोर्ट्स मोडला सपोर्ट करते. डिझो वॉच 2 मध्ये जीपीएस चिप देण्यात आलेली नाही. दरम्यान डिझो वॉच 2 ची किंमत ही 3,999 रुपये असून, याबद्दल कंपनीकडून अधिकृत कार्यक्रमामध्येच किंमतीबद्दल योग्य माहिती देण्यात येईल. हे घड्याळ क्लासिक ब्लॅक, गोल्डन पिंक, आयव्हरी व्हाइट आणि सिल्व्हर ग्रे अशा अनेक रंगांमध्ये उपलब्ध असेल.

हेही वाचा: ALERT! एटीएम-क्रेडिट कार्डचा पासवर्ड करु नका सेव्ह, अन्यथा..

डिझो वॉच प्रो

फ्लिपकार्ट वर बनवलेल्या मायक्रोसाइट वरून हे उघड झाले आहे की ही वॉचचा डिस्प्ले स्क्वेअर शेप असेल. या लोकेशन ट्रॅकिंगसाठी इन बिल्ट जीपीएस आणि ग्लोनास देखील देण्यात आले आहे. सध्या, घड्याळाच्या उर्वरित फीचर्सबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. डिझो वॉच 2 च्या लिस्टिंगवरून हे उघड झाले आहे की कंपनी लवकरच आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी डिझो अॅपची घोषणा देखील करणार आहे.

हेही वाचा: ALERT! एटीएम-क्रेडिट कार्डचा पासवर्ड करु नका सेव्ह, अन्यथा..

loading image
go to top