Modular Bridge : लष्कराला ‘४६-मीटर मॉड्यूलर ब्रिज’ प्रणालीचे बळ ; चार वर्षांत टप्प्याटप्प्याने समावेश करणार

देशाच्या विविध भागांसह सीमा भागात भारतीय लष्कराच्या हालचाली सुरळीत करण्यासाठी आता ४६ - मीटर मॉड्यूलर ब्रिज'' प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या ब्रिजिंग प्रणालीचे चार वर्षांत ४१ संच टप्प्याटप्प्याने समाविष्ट केले जाणार आहे.
Modular Bridge
Modular Bridge sakal

बागडोगरा (सिलिगुडी) : देशाच्या विविध भागांसह सीमा भागात भारतीय लष्कराच्या हालचाली सुरळीत करण्यासाठी आता ४६ - मीटर मॉड्यूलर ब्रिज'' प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या ब्रिजिंग प्रणालीचे चार वर्षांत ४१ संच टप्प्याटप्प्याने समाविष्ट केले जाणार आहे. महत्वाचे म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) दिघी येथील संशोधन आणि विकास आस्थापना (अभियंता) या प्रयोगशाळेच्या माध्यमातून या प्रणालीला विकसित करण्यात आले आहे.

डीआरडीओच्या पुण्यातील आर अँड डीई प्रयोगशाळेत या ब्रिजिंग प्रणालीची रचना करण्यात आली. या ब्रिजिंग प्रणालीच्या निर्मितीसाठी लागलेल्या सहा वर्षांचा कालावधी लागला. ‘आत्मनिर्भर’ अभियानातंर्गत याची डिझाईन, तंत्रज्ञान पूर्णपणे ‘आर अँड डीई’ची असून हे तंत्रज्ञान ‘लार्सन अँड टुब्रो’ (एल अँड टी) या उद्योगाला हस्तांतरित करण्यात आले. प्रणालीच्या चाचण्या तसेच याच्या इतर प्रक्रियांना पूर्ण करत आता या प्रणालीचा समावेश लष्करात करण्यात आला आहे.

दिल्ली येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे ही ब्रिजिंग प्रणाली लष्कराला सुपूर्त करण्यात असून सुमारे २ हजार ५०० कोटी रुपये इतक्या मूल्यांच्या ४१ संचांची मागणी लष्कराकडून करण्यात आली आहे.

असा असेल ४६- मीटर मॉड्यूलर ब्रिज

  • प्रणालीत जलद प्रक्षेपण आणि पुनर्प्राप्ती क्षमता

  • अडथळे पार करत सहज व कमी वेळेत पुलाची निर्मिती शक्य

  • जलद तैनाती आणि विविध कारवाया करण्यासाठी उपयुक्त

  • ही प्रणाली १४ ते ४६ मीटरपर्यंत आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या लांबीच्या अंतरांवर वापरले जाऊ शकते

  • पूल तयार करण्यासाठी दिवसा ९० मिनिटे आणि रात्री १२० मिनिटे इतका वेळ लागतो

  • सध्या लष्करात वापरात असलेल्या ‘मीडियम गर्डर ब्रिजेस’ची (एमजीबी) जागा ही ‘मॉड्युलर ब्रिजिंग’ प्रणाली घेणार

  • सीमा भागात कालवे, कॅनल, खचलेला रस्ता, खड्डे आदींना सहजरित्या ओलांडण्यासाठी लष्कराला व त्यांच्या लहान तसेच जड वाहनांची ये-जा करण्यासाठी ब्रिजिंग प्रणालीचा वापर करता येईल

  • प्रणालीमध्ये असलेल्या ‘मटेरियल हँडलिंग डिव्हाइस’द्वारे (क्रेन) पुलाची निर्मिती केली जाते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com