
भारतातील अनेक राज्यांत अलिकडेच वारंवार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल, तर भूकंप येण्यापूर्वीच तुम्हाला भूकंपाचा इशारा मिळू शकतो. गुगल आणि सॅमसंगने अशी अलर्ट सिस्टम विकसित केली आहे जी धोक्याच्या आधी अलर्ट पाठवून जीव वाचवू शकते. तुम्ही हे फीचर तुमच्या मोबाईल फोनमध्ये फक्त २ मिनिटांत चालू करू शकता.