esakal | Gmail चा पासवर्ड विसरलात? 'या' सोप्प्या पद्धतीने करा रिकव्हर
sakal

बोलून बातमी शोधा

gmail

Gmail चा पासवर्ड विसरलात? 'या' सोप्प्या पद्धतीने करा रिकव्हर

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्याच्या काळात ऑनलाइन व्यवहार करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे हे व्यवहार सुरक्षितरित्या व्हावेत यासाठी आपण सगळेच जण पासवर्ड सेट करत असतो. अगदी व्हॉट्स अॅपपासून जी मेलपर्यंत सगळ्यांना आपण पासवर्ड वापरतो. परंतु, बऱ्याच वेळा आपण हा पासवर्ड विसरतो आणि ऐन वेळी आपली पंचाईत होते. यामध्येच जर जी मेलचा gmail पासवर्ड विसरलात तर मग विचारायलाच नको. ऑफिसचं बरंचसं काम आपण मेलच्या माध्यमातून करत असतो. त्यामुळे पासवर्ड विसरल्यानंतर अनेकांची घाबरगुंडी उडते. म्हणूनच, जी मेलचा पासवर्ड विसरल्यानंतर तो पुन्हा रिसेट कसा करायचा ते जाणून घेऊयात. (education-career-tech-how-to-recover-gmail-password)

हेही वाचा: सार्वजनिक ठिकाणी मोफत WIFI वापरताय?; मग घ्या 'ही' काळजी

स्टेप 1-

जी मेलचा पासवर्ड विसरल्यानंतर अजिबात घाबरु नका. आपण जिथून लॉगइन करतो त्याच्याच खालती फॉरगेट पासवर्ड हा ऑप्शन असतो. या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही पासवर्ड मिळू शकता. फॉरगेट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर तेथे शेवटचा पासवर्ड विचारतील. त्यावेळी तुम्हाला जो पासवर्ड लक्षात असेल तो टाका आणि एण्टर करा. एण्टर केल्यानंतर नवीन पासवर्ड करण्याचा नवा पर्याय येईल आणि त्यावरुन तुम्ही नवीन पासवर्ड तयार करु शकता.

हेही वाचा: relationship: स्त्रियांना सतत वाटते 'या' गोष्टींची भीती

स्टेप 2 -

जीमेल अकाऊंट तयार करताना कायम तुमचा मोबाईल क्रमांक विचारला जातो. जर त्यावेळी तुम्ही मोबाईल क्रमांक दिला असेल तर पासवर्ड रिसेट करणं अत्यंत सोपं होतं. लॉगइन करताना तुमच्याकडे जीमेल कोड मागितला जाईल. या कोडच्या मदतीने तुम्ही जीमेल पासवर्ड मिळू शकता. परंतु, हा कोड काही काळासाठीच मर्यादित असतो.

स्टेप 3 -

नवीन जी मेल अकाऊंट सुरु करताना व्हेरिफिकेशन आणि आयडी रिकव्हरीसाठी अन्य दुसऱ्या जी मेल अकाऊंटची विचारणा करण्यात येते. त्यावेळी जर तुम्ही दुसरा आयडी किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मेल आयडी दिला असेल तर त्या अकाऊंटवरदेखील तुम्ही व्हेरिफिकेशन कोड मागू शकता आणि नवीन पासवर्ड सेट करु शकता.

loading image