इलेक्ट्रिक की सीएनजी? कोणते वाहन आहे बेस्ट, जाणून घ्या फायदे-तोटे

Electric Vs CNG Car which one is best
Electric Vs CNG Car which one is best

Electric Car Vs CNG Car : पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे लोक इलेक्ट्रिक (EV) आणि सीएनजी (CNG) वाहनांकडे वळत आहेत. वाहन उद्योगात गेल्या पाच वर्षांत बरेच बदल झाले आहेत. ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहने बनवण्यावर अधिक भर देत आहेत. ग्राहकांसाठी अधिक परवडणाऱ्या वाहनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने आणि सीएनजी वर चालणाऱ्या कारच्या विक्रीत पूर्वीपेक्षा अधिक वेगाने वाढ झाली आहे.

देशातील एकूण वाहन विक्रीच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारची विक्री अजूनही खूपच कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात मोठी वाढ झाली आहे. सीएनजी वाहनांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. चला जाणून घेऊया इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार घेण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत? (Electric Vs CNG Car which one is best)

सीएनजी वाहनांचे फायदे

CNG वाहने किंवा कार बद्दल बोलायचे झाल्यास, भारतात खूप दिवसांपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसवर चालतात. मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर सारख्या अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, जे अशा वाहनांची जास्तीत जास्त विक्री करतात. सीएनजी वाहनांचा एक मोठा फायदा म्हणजे पेट्रोल डिझेलच्या किंमतीचा विातार करावा लागत नाही आणि सीनजीची किमतही कमी असते.

सीएनजीच्या दरात वाढ झाली असली तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या तुलनेत ते खूपच कमी आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र सीएनजी वाहनांवर चालणाऱ्या लोकांवर फारसा बोजा पडलेला नाही. देशात सध्या पेट्रोलचा दर 95 रुपयांच्या आसपास आहे, तर सीएनजीचा दर 53 रुपयांच्या आसपास आहे.

सीएनजी कारची खासियत म्हणजे त्यात तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलवर चालवण्याचा पर्याय मिळतो. जर कोणाचा सीएनजी संपला, तर तुम्ही कार पुढील सीएनजी इंधन स्टेशनवर नेण्यासाठी पेट्रोलियम वापरू शकता. सीएनजीवर चालणारी वाहनेही प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपयुक्त आहेत.

Electric Vs CNG Car which one is best
टेक कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! दिला 1 कोटीहून जास्तीचा बोनस

सीएनजी वाहनांचे तोटे

  • सीएनजी कार खरेदी करणे ही नेहमीच फायद्याचे ठरत नाही, कारण एकदा सीएनजी किट बसवल्यानंतर कारमधील बरीच जागा व्यापते. तुमच्या सामानासाठी जी जागा किंवा वेगळे फीचर असायला हवे होते, ती जागा सिलेंडरने व्यापलेली असते. सीएनजी किट सामान्यत: कारच्या बूट स्पेसमध्ये इंस्टॉल केले जाते, ज्यामुळे तुम्ही तुमचे जड सामान वाहनात लोड करू शकत नाही.

  • दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशभरातील सीएनजी स्टेशनची उपलब्धता. भारतातील काही राज्यांमध्ये किंवा शहरांमध्ये सीएनजी स्टेशन शोधणे कठीण आहे. अशा ठिकाणी तुम्ही पेट्रोलियमशिवाय प्रवास करू शकत नाही. तुम्हाला नेहमी लाँग ड्राइव्ह करताना याचा विचार करावा लागतो.

  • तिसरे आणि सर्वात मोठे कारण म्हणजे वाहनाची कार्यक्षमता. सीएनजीच्या वापरामुळे ठराविक कालावधीनंतर वाहनाच्या परफऑर्मंसवर परिणाम होतो. सीएनजी कारचे पॉवर आउटपुट पेट्रोल किंवा डिझेल कारच्या आउटपुटपेक्षा 10 टक्के कमी असू शकते.

Electric Vs CNG Car which one is best
भारतीय सैन्यात इंजिनीअर उमेदवारांना नोकरीची संधी; पाहा डिटेल्स

इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे

  • भारतात आता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळत आहे. अनेक राज्यांनी इलेक्ट्रिक वाहन धोरणे जाहीर केली आहेत. यामध्ये खरेदीदारांना इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडे आकर्षित केले जाते. आताही इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी काही ठिकाणी आरटीओ फी किंवा रोड टॅक्स आकारला जात नाही.

  • इलेक्ट्रिक वाहने चालवण्यासाठी सर्वात स्वस्त आहेत. ईव्ही कार चालवण्याचा खर्ज सीएनजी वाहनापेक्षा कमी आहे. त्याची मेंटन्स खर्च जवळजवळ शून्य आहे, ज्यामुळे ग्राहकांचे बऱ्यापैकी पैसे वाचतात.

  • शून्य कार्बन उत्सर्जनामुळे इलेक्ट्रिक वाहनांना जगभरात पसंती दिली जाते. जवळजवळ प्रत्येक देश प्रदूषणाशी लढा देत आहे, अशा परिस्थितीत प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने सर्वात जास्त उपयुक्त आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांचे तोटे

त्याच्या तोट्यांबद्दल सांगायचे तर, भारतात ईव्ही वाहने अजूनही खूप महाग आहेत. सामान्य माणूस ते विकत घेऊ शकत नाही. वाहनात महागड्या बॅटरीचा वापर केला म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत सामान्य कारपेक्षा जास्त असते. इलेक्ट्रिक टू-व्हीलरची किंमत देखील इतर गाड्यांपेक्षा खूप जास्त आहे.

ई-चार्जिंग स्टेशन्स आणि वाहनांची रेंज अजूनही ई-वाहनांसाठी आव्हान आहे. जे लोक इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्याचा विचार करतायत त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आहे ते वाहनाची रेंज, म्हणजे एका चार्जमध्ये ते किती चालेल हे आहे. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा सध्या देशात पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत . सीएनजी किंवा पेट्रोलियमच्या तुलनेत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स सध्या फार कमी आणि मर्यादित ठिकाणी उपलब्ध आहेत. बर्‍याच परवडणाऱ्या ईव्ही एकाच चार्जवर 400 किमी पेक्षा कमी अंतर चालतात, जे लाँग ड्राइव्हसाठी चांगले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com