Electric Car Buying Tips : नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Car Buying Tips

नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या

Electric Car Buying Tips : पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) मागणी प्रचंड वाढली आहे. लोक केवळ इलेक्ट्रिक वाहनांबद्दल (EV) इंटरनेट शोधत नाहीत तर ते खरेदी देखील करत आहेत. मोठ्या शहरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने दिसत आहेत. जर तुम्हीही इलेक्ट्रिक कार (Electric Car) घेण्याचा विचार करत असाल तर, आधी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या. कारण नकळत इलेक्ट्रिक वाहन घेणे तुमच्यासाठी मोठी चूक ठरू शकते. तर जाणून घ्या इलेक्ट्रिक कार खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याबद्दल आज जाणून घेऊया.

1. कार स्पेसिफिकेशन्स

जगभरात इलेक्ट्रिक कारची रेंज (एकदा चार्ज केल्यास धावण्याची क्षमाता) खूपच वाढली आहे. इलेक्ट्रिक मोटर्सपासून ते वेगवेगळ्या क्षमतेचे बॅटरी पॅक उपलब्ध आहेत. तुम्ही तुमची इलेक्ट्रिक कार निवडण्यापूर्वी, तुमच्या गरजा जाणून घ्या. त्यानुसार तुमच्यासाठी योग्य असेल तीच कार खरेदी करा.

2. ड्राइव्ह रेंज

इलेक्ट्रिक कारमध्ये विचारात घेण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कारची ड्राइव्ह रेंज किती आहे, सिंगल चार्जमध्ये कार किती किमी चालू शकते हे अत्यंत महत्वाचे फीचर आहे, त्यामुळे तुमची गरज ओळखून कार निवडा. तसेच कार खरेदी करताना कार निर्मात्याने केलेल्या रेंजच्या दाव्यांवर डोळे बंद ठेऊन विश्वास ठेवू नका. कार खरेदी करण्यापूर्वी, वास्तविक आढावा घ्या आणि प्रत्यक्ष कारची रेंज काय आहे ते तपासून घ्या.

हेही वाचा: भारतात 1200 कोटींचा क्रिप्टो घोटाळा; शेकडो गुंतवणूकदारांना घातला गंडा

3. बॅटरी लाईफ

कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बॅटरी हा असतो. यासोबतच बॅटरी हा इलेक्ट्रिक कारमधील सर्वात महागडा पार्ट देखील आहे. जर तुम्ही कार खरेदी करताना बॅटरीकडे लक्ष दिले नाही किंवा पुरेसा रिसर्च केला नाही, तर भविष्यात बॅटरी बदलणे तुमच्या खिशाला खूप जड जाऊ शकते. त्यामुळे कमी मेंटनंस खर्च आणि जास्त बॅटरी लाइफ असलेली बॅटरी निवडा.

4. चार्जिंग ऑप्शन्स

इलेक्ट्रिक कार बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ते चार्ज करण्यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. फास्ट चार्जिंग, स्टँडर्ड चार्जिंग आणि स्लो चार्जिंग. फास्ट चार्जिंगसाठी चार्जर इंस्टॉल करणे खूप कठीण असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात स्टँडर्ड आणि स्लो चार्जिंग देखील इंस्टॉल करू शकता. त्यामुळे, ईव्ही कार खरेदी करण्यापूर्वी, चार्जिंग ऑप्शनचा विचार करा.

हेही वाचा: Realme ची रेकॉर्डब्रेक विक्री; फक्त तीन मिनिटात विकले 233 कोटीचे फोन

5. अतिरिक्त खर्च

इलेक्ट्रिक कार खरेदी करणे इतके सोपे नाही. कार खरेदी करण्याव्यतिरिक्त, त्याच्याशी संबंधित काही इतर खर्च आहेत. त्यासाठी होम चार्जर, चार्जिंग स्टेशन बसवणे, चार्जिंग स्टेशनची देखभाल यासाठी पैसे खर्च करावे लागतात. जे तुम्हाला रेग्युलर वाहनांपेक्षा खूप जास्त असू शकतो.

6. सॉफ्टवेअर अपडेट

प्रगत तंत्रज्ञान असलेली इलेक्ट्रिक वाहने किंवा कार बाजारात दाखल झाल्या आहेत. कार उत्पादक सहसा सॉफ्टवेअर अपडेट्सद्वारे लेटेस्ट तंत्रज्ञान वापरतात. कार खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला रेग्युलर सॉफ्टवेअर अपडेट मिळत असल्याची खात्री करा. परदेशातील काही कार उत्पादक फ्री रेग्युलर सॉफ्टवेअर अपडेट देतात परंतु काही उत्पादक त्यासाठी पैसे आकारतात.

हेही वाचा: लस घेतल्यावर देखील अनेकांना कोरोना का होतोय, जाणून घ्या सर्वकाही

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top