Electricity Bill On Whatsapp : आता इलेक्ट्रीसिटी बिलही करा Whatsapp? सेव्ह करा हा टोल फ्री नंबर!

How to pay electricity bill online: सोयीस्कर आणि सुरक्षित पेमेंटच्या दिशेने आणखी एक पाऊल
Electricity Bill On Whatsapp
Electricity Bill On Whatsappesakal

Pay Electricity Bill Whatsapp : सध्या सगळं जग ऑनलाईन झालंय. त्यामुळं ऑनलाईन काम आणि ऑनलाईन व्यवहारही जोमात सुरू आहेत.

डिजिटल पेमेंटच्या वाढत्या ट्रेंडमुळे अनेक कंपन्या सर्व प्रकारची बिले भरण्यासाठी अनेक सुविधा देत आहेत. त्यातच आता Whatsapp वर पेमेंट सुविधा सुरू झाली आहे.  

मध्य प्रदेशातील वीज ग्राहकांना आता व्हॉट्सअॅपवर बिल भरता येणार आहे. वीज कंपनीच्या या उपक्रमामुळे बिले भरणे सोपे होणार आहे. ही सुविधा सुरू झाल्याने ग्राहकांना बिले भरणे सोपे होणार असल्याचे मध्य प्रदेश वीज वितरण कंपनीने म्हटले आहे.

 विशेष म्हणजे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वीजबिल भरणे सुरक्षित आणि वापरण्यास सोपे आहे. ग्राहक त्यांच्या विद्यमान व्हॉट्सअॅप अकाऊंटचा वापर करून कोणत्याही त्रासाशिवाय पेमेंट करू शकतात. जाणून घेऊया कसे?(WhatsApp)

Electricity Bill On Whatsapp
Whatsapp : केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर 'व्हॉट्सअप'चं आश्वासन; आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्स 50 टक्के कमी करणार

 मध्य प्रदेश वीज वितरण कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही वीज बिल भरण्याचे डिजिटल माध्यम पुढे आणून सोयीस्कर आणि सुरक्षित पेमेंटच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.

सध्या ग्राहकांना बिल भरण्यासाठी डझनाहून अधिक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये व्हॉट्सअॅप-पेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.

 सेंट्रल रिजन पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅप-पे पेमेंट फीचरच्या माध्यमातून आमचे ग्राहक घरबसल्या सहजपणे बिल भरू शकतात.

सध्याच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटचा वापर करून ग्राहक ते आपल्या बँक खात्याशी लिंक करू शकतात. त्याचबरोबर ज्या ग्राहकांकडे व्हॉट्सअॅप-पे सुविधा नाही, ते गुगल-पे, फोन-पे किंवा पेटीएम सारख्या इतर यूपीआय मोडद्वारेही व्हॉट्सअॅपवरून पैसे भरू शकतात.

Electricity Bill On Whatsapp
Twitter New Feature : आता Twitter आणणार ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलचं फीचर, WhatsApp चं वाढलं टेन्शन

विशेष म्हणजे व्हॉट्सअॅपवरून वीजबिल भरण्यासाठी अतिरिक्त डाऊनलोड किंवा नवीन नोंदणीची गरज नाही. या नव्या सुविधेचा वापर करण्यासाठी ग्राहकांना सेंट्रल झोन वीज वितरण कंपनीच्या 07552551222 टोल फ्री नंबर सेव्ह करून चॅटिंग सुरू करता येणार आहे.

व्ह्यू अँड पे बिल पर्यायाचा वापर करून, त्यांना पेमेंट पूर्ण करण्याच्या सूचनांसह प्रॉम्प्ट मिळेल. पेमेंट पूर्ण केल्यानंतर ग्राहकाला कन्फर्मेशन मेसेज येईल. अधिक माहितीसाठी ग्राहक portal.mpcz.in किंवा १९१२ वर संपर्क साधू शकतात किंवा जवळच्या वीज वितरण केंद्राशी संपर्क साधू शकतात.

 ट्रेन चुकली तर मिळेल पूर्ण परतावापुढे बघा...

 काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश पश्चिम विभागीय वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकाला वीज पुरवठा सुरू केला. याअंतर्गत ३३ लाख ग्राहकांची वीजबिले मोबाइलवर पाठविण्यात आली. वीज कंपनीने सर्वप्रथम ग्राहकांना त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर स्वागताचा संदेश दिला.

Electricity Bill On Whatsapp
RCB v LSG : BP वाढवणारा सामना... एक चेंडू... एक धावा... अन् सामना झाला एक नंबर! थरार न झेपणारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com