Video: इलॉन मस्क यांच्या 'न्यूरालिंक' रुग्णाची कमाल; केवळ विचार करुन कंट्रोल करतोय कॉम्प्युटर, खेळू लागलाय चेस

Elon Musk brain chip startup Neuralink: मेंदुत चिप बसवण्यात आलेला रुग्ण केवळ आपल्या विचारांचा वापर करुन ऑनलाईन चेस आणि व्हिडिओ गेम खेळू शकत आहे.
Neuralink
Neuralink

नवी दिल्ली- इलॉन मस्क यांचे ब्रेन-चिप स्टार्टअप न्यूरोलिंक प्रोजेक्ट मोठी प्रगती करत असताना दिसत आहे. मेंदुत चिप बसवण्यात आलेला रुग्ण केवळ आपल्या विचारांचा वापर करुन ऑनलाईन चेस आणि व्हिडिओ गेम खेळू शकत आहे. यासंदर्भाती एक व्हिडिओ न्यूलोलिंकने शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. (Elon Musk brain chip startup Neuralink first patient being able to play online chess and video games just by his thoughts)

न्यूरालिंकने व्हिडिओमधून दाखवलंय की, त्यांचा पहिला रुग्ण कॉम्प्युटरला कंट्रोल करु शकत आहे. तो चेस खेळतोय आणि इतर व्हिडिओ गेम देखील खेळू शकतो. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. मेंदुमध्ये चिप बसवलेला रुग्ण देखील आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Neuralink
Elon Musk on Drugs : 'एवढी मोठी कंपनी चालवण्यासाठी गरज असतेच', ड्रग्ज घेण्याबद्दल इलॉन मस्कने दिलं स्पष्टीकरण

व्हिडिओमध्ये, २९ वर्षीय रुग्ण Noland Arbaugh स्वत:ची ओळख सांगतोय. एका अपघातात त्याच्या खांद्याच्या खालील भाग निष्क्रिय झाला आहे. त्यामुळे तो हालचाल करु शकत नाही. तो लॅपटॉपवर चेस खेळताना दिसत आहे. न्यूरालिंक उपकरणाचा वापर करुन तो कर्सर हलवत आहे आणि चेस खेळत आहे. न्यूरालिंकने ही मोठी प्रगती असल्याचं म्हटलं आहे.

लाईव्ह व्हिडिओमध्ये Noland Arbaugh म्हणतोय की, तुम्हाला कर्सर हलताना दिसत असेल तर तो मी आहे. हे खूप भारी आहे. मी हे करु शकत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. मी केवळ विचार करुन कर्सर हलवू शकतोय.

Neuralink
Elon Musk : फेसबुकच्या इंजिनिअरने केली इलॉन मस्कची बोलती बंद; म्हणाला होता माणसांपेक्षा हुशार होईल 'एआय'

न्यूरालिंक राय आहे?

न्यूरालिंक ब्रेन चिप स्टार्टअपची सुरुवात इलॉन मस्क यांनी २०१६ मध्ये केली होती. हे एक नाण्याच्या आकाराचे उपकरण आहे, ऑपरेशन करुन ती शरिरात ठेवली जाते. याची एक अत्यंत सुक्ष्म तार मेंदूपर्यंत जाते. त्यामुळे माणसांच्या मेंदूचा कॉम्प्युटरशी brain-computer interface (BCI) संपर्क साधता येऊ शकतो. मेंदुतील विचारांची नोंद घेऊन हे उपकरण ते कॉम्प्युटरकडे पाठवते.

फेब्रुवारी महिन्यामध्ये इलॉन मस्क यांनी सांगितलं होतं, की पहिल्या मानवामध्ये चिप बसवण्यात आली आहे. न्यूरालिंकचा हा रुग्ण पूर्णपणे बरा आहे आणि तो आपल्या विचारांच्या माध्यमातून कॉम्प्युटरला काही सूचना देऊ शकत आहे. माऊस कंट्रोल करु शकत आहे. सध्या रुग्णावर कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com