Twitter Downvote : ट्विटरची मालकी येताच मस्क यांच्याकडून पहिला बदल; आणलं नवं फीचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk Twitter Deal

Twitter Downvote: ट्विटरची मालकी येताच मस्क यांच्याकडून पहिला बदल; आणलं नवं फीचर

वॉशिंग्टन : ट्विटरची मालकी आपल्याकडे आल्यानंतर लगेचच इलॉन मस्क यांनी माक्रोब्लॉगिंग साईटमध्ये पहिला बदल केला आहे. त्यांनी युजर्ससाठी डाऊनवोट नावाचं नवं फीचर आणलं आहे. हे फीचर पोस्टसंदर्भात नसून कमेंट संदर्भात आहे. डाऊनवोट सर्वांना दिसणार नाही, तसेच त्याला लाईक्सप्रमाणं मोजताही येणार नाही. (Elon Musk first change since owning Twitter New feature introduced as Twitter Downvote)

हेही वाचा: मविआच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली; नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ

डाऊनवोट हे फीचर डिस्लाईक सारखं फीचर असणार नाही. तर जे लोक एखाद्या पोस्टवर अपमानजनक कमेंट करतात किंवा ज्या कमेंट विषयाला धरुन नसतात त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी हे डाऊनवोट नावाचं हे फीचर आणण्यात आलं आहे.

हेही वाचा: Nancy Pelosi: अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पॅलोसींच्या घरावर हल्ला; पती जखमी

ट्विटर पूर्णपणे आपल्या ताब्यात आल्यानंतर लगेचच मस्क यांनी टाऊनवोटचं फीचर सुरु केलं. ट्विटरच्या स्थापनेपासून युजर्सनं हा सर्वात मोठा बदल पाहिला असेल. मस्क यांचे मागचे ट्विट्स जर आपण पाहिले असतील तर आता एक एक करुन अनेक गोष्टी ट्विटरमध्ये बदलतील हे निश्चित.

युजर्सना डाऊनवोट फीचरचे मिळताहेत पॉपअप

जर युजर कोणताही रिप्लाय देत नसेल तर ते ट्विटरला डाऊनवोट करुन याबाबत माहिती देऊ शकतात. डाऊनवोट हा युजर्सचा खासगी विषय असणार आहे. यावर केलेली कृती ही सर्वाजनिक केली जाणार नाही.