WhatsAppचे नवीन फिचर्स.. आता 2 GB पर्यंत करता येणार फाईल शेअर | Whatsapp New Features | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

whatsapp

WhatsAppचे नवीन फिचर्स.. आता 2 GB पर्यंत करता येणार फाईल शेअर

व्हाट्सॲप हा दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ख्याती असलेले व्हाट्सॲप नवनवीन आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फिचर आणत असतात.

गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक नव्या फीचरची बीटा टेस्टिंग सुरु होती. चॅटमध्ये ओव्हरलोड कमी करण्यास हे फिचर्स मदत करेल. ही फिचर्स येत्या आठवड्यात आणली जात आहेत.

कम्युनिटी फीचर (Communities feature to organise multiple groups)

व्हॉट्सअॅपवरील कम्युनिटी फीचर लोकांना एका छत्राखाली स्वतंत्र गट एकत्र आणण्यास सक्षम करणार आहे. युजर्स त्यांच्यासाठी काय महत्त्वाचे आहे यावर लहान चर्चा गट सहजपणे तयार करू शकतात.

व्हाट्सॲप ग्रुप ॲडमिन चॅटमधून चुकीचे मॅसेज डिलीट करु शकणार
इतर कोणत्याही युजर्सकडून मॅसेज हटविण्यासाठी आगामी अपडेट्ससह, व्हाट्सॲप ग्रुप अॅडमिन प्रत्येकाच्या चॅटमधून चुकीचे मॅसेज डिलीट करण्यास सक्षम असतील. आतापर्यंत केवळ पाठवणाऱ्यांनाच त्यांचे मॅसेज डिलीट करण्याची परवानगी होती.

हेही वाचा: युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम! भारतात TV च्या किंमती वाढणार

2GB पर्यंत फाइल शेअर करु शकता

सध्या, तुम्ही WhatsApp वर फक्त 100mb एवढी मोठी फाईल शेअर करू शकता परंतु आगामी अपडेट्समुळे तुम्हाला 2 GB फाइल ट्रान्सफर करु शकणार आहे.

32 लोकांना वन-टॅप व्हॉइस कॉलिंग करता येणार

WhatsAppच्या नवीन फिचरमुळे 32 लोकांपर्यंत वन-टॅप व्हॉइस कॉलिंग करता येणार. कंपनी ग्रुप व्हॉईस कॉल फिचरमध्ये बदल करत आहे.

हेही वाचा: लवकरच येतायत Maruti च्या 'या' तीन CNG कार; जाणून घ्या खासियत

या शिवाय WhatsAppच्या एका आणखी नवीन फीचरच्या मदतीनं पाच डिवाइसेज एकाच अकॉऊंटशी कनेक्ट करता येतील. या फिचरला ‘व्हॉट्सअ‍ॅप लिंक्ड डिवाइस’ असं नाव देण्यात आलं आहे. हे व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्समध्ये दिसण्यास सुरुवात झाली आहे. या फीचरच्या माध्यमातून आता जरी तुमचा प्रायमरी फोनमा इंटरनेटशी कनेक्टड नसेल, तरी अन्य डिवाइसेजवर तेच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट वापरता येईल. परंतु 14 दिवसांपेक्षा जास्त प्रायमरी डिवाइस बंद ठेवता येणार नाही.