Elon Musk X Chat Messaging App : इलॉन मस्कने लाँच केलं X Chat! ; आता ‘WhatsApp’ अन् ‘Arattai’ला जबरदस्त टक्कर

Elon Musk launches X Chat app : जाणून घ्या, काय आहेत या नवीन चॅटिंग अपची वैशिष्ट्ये?
Elon Musk unveiling the new X Chat messaging app, designed to challenge WhatsApp and Arattai with advanced privacy and communication features.

Elon Musk unveiling the new X Chat messaging app, designed to challenge WhatsApp and Arattai with advanced privacy and communication features.

esakal

Updated on

What Is Elon Musk’s New X Chat Messaging App? : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk ने नवीन मेसेंजिंग सर्व्हिस लाँच केली आहे. ज्याचे नाव X Chat आहे. याचा लाभ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवरच वापरू शकाल. चॅट सर्व्हिसचा वापर करून हे मेसेंजिंग App WhatsApp आणि Arattai यांना टक्कर देणार आहे.

या मेसेंजिंग सर्व्हिसला काही नवीन फिचर्ससह सादर केले गेले आहे. यामध्ये एंड टू एंड इनक्रिप्शन, अडव्हान्स मेसेंजिंग कंट्रोल आणि स्वतंत्र मेसेंजिंग इनबॉक्स मिळेल. हे फिचर्स आल्यानंतरही यूजर्स DM आणि नवीन मेसेंजिग सर्व्हिस अंतर्गत मिळणारे मेसेज वेगवेगळे पाहता येतील.

इलॉन मस्क्ने पोस्टकरून सांगितले की, X ने एक पूर्णत: नवीन कम्युनिकेशन्स सेवा सुरू केली आहे. यामध्ये एनक्रिप्शनसोबतच मेसेंजिंग, ऑडिओ, व्हिडिओ आणि फाइल ट्रान्सफर करू शकाल.

Elon Musk unveiling the new X Chat messaging app, designed to challenge WhatsApp and Arattai with advanced privacy and communication features.
Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

हेल्प सेंटरमध्ये एक्स चॅटबद्दल तपशील शेअर केले गेले आहेत. त्यात म्हटले आहे हे आता की पूर्वीसारखे नाही, आता ग्रुप मेसेज आणि मीडिया एन्क्रिप्ट केले जाऊ शकतात. तसेच, मस्कच्या नवीन मेसेजिंग सर्व्हिस अंतर्गत, युजर्स आधीच पाठवलेले मेसेज एडिट, डिलीट आणि गायब देखील करू शकतात.

Elon Musk unveiling the new X Chat messaging app, designed to challenge WhatsApp and Arattai with advanced privacy and communication features.
Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

मेसेज डिलीट केल्यानंतर व्हॉट्सअॅपवर this message was deleted असा मेसेज दिसतो, मात्र हा मेसेज एक्स चॅटवर दिसणार नाही. चॅट प्रायव्हसीचे संरक्षण करण्यासाठी, एक्स चॅटमध्ये स्क्रीनशॉट ब्लॉक करता येतात. दुसरा युजर्स प्रायव्हेट मेसेजचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही.

Elon Musk unveiling the new X Chat messaging app, designed to challenge WhatsApp and Arattai with advanced privacy and communication features.
Fake Tiger and Real Tiger Viral Video : खतरनाक!!! वाघाचं कातडं पांघरून जंगलातील वाघाच्या तोंडासमोर गेला पठ्ठ्या अन् मग...

एक्स चॅट सध्या फक्त iOS आणि वेब व्हर्जनवर उपलब्ध आहे. एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या डीएम विभागात जाऊन ते वापरता येते. मात्र ते लवकरच अँड्रॉइडसाठी रिलीज केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com