Elon Musk New Name : इलॉन मस्कनं स्वतःचं नाव बदललं अन् क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये झाली मोठी उलथापालथ; Kekius Maximus या नावाचा नेमका विषय काय?

Elon Musk New Name Kekius Maximus : इलॉन मस्कनं स्वतःचं नाव बदललं आहे. आता त्याचे नवीन नाव Kekius Maximus असे आहे.
Elon Musk new name KekiUS Maximus
Elon Musk Changed his name as KekiUS Maximusesakal
Updated on

Elon Musk Name Change : टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनी आपल्या नावात अनपेक्षित बदल करत सोशल मीडियावर नवा ट्रेंड निर्माण केला आहे. ट्विटरचे पूर्वीचे नाव असलेल्या X या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एलन मस्क आता ‘केकीयस मॅक्सिमस’ या नावाने ओळखले जात आहेत. त्यांच्या या नावाच्या बदलामुळे क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे.

'केकीयस मॅक्सिमस’ नावाचा उगम

‘केकीयस मॅक्सिमस’ हे नाव लोकप्रिय ‘पेप द फ्रॉग’ मीमच्या वॉरियरवर आधारित आहे. या मीममध्ये पेपला वॉरियरसारखी पोशाख आणि व्हिडिओ गेमचा जॉयस्टिक हातात असलेला दाखवण्यात आला आहे. या नावाची प्रेरणा ‘ग्लॅडिएटर’ चित्रपटातील नायक ‘मॅक्सिमस’वरून घेण्यात आली आहे. इलॉन मस्क यांनी ही नवी ओळख स्वीकारल्याने त्यांचं X प्रोफाइल फोटो देखील बदललं आहे.

Elon Musk new name KekiUS Maximus
Youtube Play Something : नव्या वर्षात यूट्यूबमध्ये जबरदस्त फीचरची एंट्री; कसं वापरायचं 'Play Something'? पाहा एका क्लिकवर

केकीयस मॅक्सिमस क्रिप्टोकरन्सीची भरारी

इलॉन मस्क यांच्या या नावाच्या बदलानंतर ‘केकीयस मॅक्सिमस’ नावाच्या नवीन मेमकॉइनची किंमत झपाट्याने वाढली. कोइनगेकोच्या अहवालानुसार, या मेमकॉइनने केवळ काही तासांतच 500 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. गेल्या सात दिवसांमध्ये केकीयस मॅक्सिमसची किंमत तब्बल 4780 टक्क्यांनी वाढली असून सध्या ₹9.93 आहे. मागील 24 तासांत या कॉइनच्या व्यवहाराची एकूण रक्कम ₹5,562 कोटींहून अधिक होती.

Elon Musk new name KekiUS Maximus
Samsung Mobile Discount : खुशखबर! सॅमसंग गॅलक्सीचा ब्रँड 5G मोबाईल मिळतोय फक्त 15 हजारात, कुठं सुरूय ऑफर? पाहा एका क्लिकमध्ये

क्रिप्टो बाजारात नवीन ट्रेंड

‘केकीयस मॅक्सिमस’च्या जोरदार यशामुळे क्रिप्टो बाजारात नवीन मेमकॉइन्सची भरती झाली आहे. या ट्रेंडचा परिणाम इतर केकीयस-प्रेरित कॉइन्सवरही दिसून आला आहे. काही नव्याने लाँच झालेल्या क्रिप्टोकरन्सींनी देखील 200 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.

इलॉन मस्क यांच्या नावातील या बदलामुळे क्रिप्टो बाजारात मोठा बदल बघायला मिळत आहे. मात्र, या नवीन ट्रेंडमुळे पुढे काय घडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com