
Starlink Internet Plan : वेगवान इंटरनेटच्या क्षेत्रात क्रांती म्हणून गणल्या जाणाऱ्या एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ या उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या इंटरनेट सेवेला येत्या दोन महिन्यांत देशाच्या काही भागांत सुरुवात होणार आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेसाठी आवश्यक ‘सॅटेलाइट डिश’ उपकरणाची किंमत अंदाजे ३३ हजार रुपये ठेवली असून, मासिक अमर्यादित ‘डेटा प्लॅन’ अंदाजे तीन हजार रुपये असू शकतो. सध्या देशात मिळणाऱ्या इंटरनेटच्या तुलनेत ही रक्कम जास्त असली तरीही दुर्गम भागांसाठी ही सेवा वरदान ठरू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.