
भारतात आता इंटरनेटच्या क्षेत्रात मोठा बदल घडणार आहे. इलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्सला भारत सरकारने उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा पुरवण्यास मान्यता दिली आहे. या सेवेच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात जिथे पारंपरिक ब्रॉडबँड सेवा उपलब्ध नाहीत तिथे हायस्पीड इंटरनेट पोहोचणार आहे. स्टारलिंकने यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) सोबत हातमिळवणी केली असून ग्राहकांच्या ओळख पडताळणीसाठी आधार ई केवायसी प्रणालीचा वापर केला जाणार आहे.