X Community Notes : आता तुम्हाला स्वतःलाच करता येईल 'फॅक्ट चेक'; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'एक्स'चं खास फीचर भारतात लाँच

Elon Musk : एक्सने 2022 साली कम्युनिटी नोट्स हे फीचर लाँच केलं होतं. ग्लोबल लेव्हलला आधीच लाँच झालेलं हे फीचर आता भारतात देखील मिळेल अशी घोषणा इलॉन मस्कने केली आहे.
X Community Notes
X Community NoteseSakal

X Community Notes Feature : भारतात काही दिवसांमध्येच लोकसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांतून प्रचाराला वेग आला आहे. मात्र सोबतच खोटी माहिती आणि अपप्रचार होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. कित्येक संस्था खोट्या दाव्यांचं 'फॅक्ट चेक' करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. यातच आता 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील एक खास फीचर भारतातील यूजर्ससाठी उपलब्ध करून दिलं आहे.

कम्युनिटी नोट्स

एक्सने 2022 साली कम्युनिटी नोट्स हे फीचर लाँच केलं होतं. ग्लोबल लेव्हलला आधीच लाँच झालेलं हे फीचर आता भारतात देखील मिळेल अशी घोषणा इलॉन मस्कने (Elon Musk) केली आहे. फेक न्यूज किंवा मिसइन्फर्मेशन रोखण्यासाठी या फीचरचा वापर केला जातो आहे.

कसा कराल वापर?

एक्स आपल्या कम्युनिटी नोट्स प्रोग्राममध्ये काही ठराविक यूजर्सना संधी देणार आहे.

यासाठी काही नियमांची पूर्तता करणं गरजेचं आहे.

कम्युनिटी नोट्स प्रोग्राममध्ये सहभागी झालेले यूजर्स चुकीची माहिती देणाऱ्या पोस्टला रिपोर्ट करू शकतील.

सोबतच त्या पोस्टमधील खोटा दावा खोडून, खरी माहिती कम्युनिटी नोट्समध्ये लिहिण्याचा पर्यायही या यूजर्सना उपलब्ध होईल.

म्हणजेच, कम्युनिटी नोट्स फीचरच्या माध्यमातून आता सामान्य नागरिक देखील फॅक्ट चेकिंगचं काम करू शकणार आहेत.

X Community Notes
X Premium : इलॉन मस्कने दिली आनंदाची बातमी; आता 'एक्स'चे प्रीमियम प्लस फीचर्स मिळणार अगदी मोफत

काय आहेत नियम?

कम्युनिटी नोट्स प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी यूजर्सना काही नियम आणि अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे.

अर्ज करणाऱ्या यूजरने 1 जानेवारी 2023 नंतर एक्सच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नसावं.

अर्ज करणारा यूजर कमीत कमी सहा महिन्यांपूर्वी एक्सवर जॉईन झालेला असावा.

यूजरकडे एखाद्या विश्वासार्ह ऑपरेटरचा व्हेरिफाईड फोन क्रमांक असायला हवा.

इतर कम्युनिटी नोट्स यूजर्सशी अर्ज करणाऱ्या यूजरचा संबंध नसावा.

X Community Notes
Elon Musk on Drugs : 'एवढी मोठी कंपनी चालवण्यासाठी गरज असतेच', ड्रग्ज घेण्याबद्दल इलॉन मस्कने दिलं स्पष्टीकरण

कसं होईल फॅक्टचेक?

एक्सवरील एखाद्या मिसलीडिंग किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्टला निवडा.

यानंतर कोपऱ्यातील तीन डॉट असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला Write Community Note and Report हा पर्याय दिसेल.

यानंतर तुम्ही पोस्टबद्दल योग्य माहिती कम्युनिटी नोटमध्ये लिहू शकाल. तसंच चुकीच्या पोस्टला रिपोर्ट देखील करू शकाल.

कम्युनिटी नोट्स प्रोग्राममध्ये सहभागी झालेला यूजर दिशाभूल करणारी पोस्ट डिलीट देखील करू शकेल.

या फीचरचं अल्गोरिदम अगदी ओपन आणि सार्वजनिक ठेवण्यात आलेलं आहे.

कम्युनिटी नोट्समध्ये सहभाग नोंदवणारे यूजर्स एका दिवसात ठराविक पोस्टचं फॅक्ट चेक करू शकतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com