X Upcoming Feature : एक्सवर दिसणार आता अ‍ॅडल्ट कंटेंट? इलॉन मस्क आणणार नवे फीचर

X Upcoming Feature : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लवकरच एक फीचर येणार आहे.
X Upcoming Feature
X Upcoming Feature esakal

X Upcoming Feature : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लवकरच एक फीचर येणार आहे. हे फीचर आता युझर्सना थेट अ‍ॅडल्ट कंटेंट किंवा कामासाठी सुरक्षित नसलेल्या कंटेंटशी (Not safe for work) जोडणार आहे. काही रिपोर्टनुसार, या फीचरवर सध्या काम सुरू असल्याची माहिती मिळतेय.

या फीचरमुळे युझर्स आता थेट अ‍ॅडल्ट कंटेंटशी निगडीत असणाऱ्या गटामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. खरे तर अशा प्रकारचे कंटेंट सोशल मीडियावर पहायला मिळतात. परंतु, याचा प्रचार किंवा अशा कंटेंटला प्रसिद्धी कुणी देत नाही. या अ‍ॅडल्ट कंटेंटच्या फीचरबद्दल X तर्फे अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, या फीचरवर टेस्टिंग सुरू असल्याचे काही रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

X Upcoming Feature
X TV App : आता यूट्यूबचा बाजार उठवणार इलॉन मस्क? लवकरच येणार 'एक्स'चं टीव्ही अ‍ॅप, पाहता येणार मोठे व्हिडिओ

अ‍ॅडल्ट लेबल दिसणार?

काही रिपोर्ट्सनुसार, जे वापरकर्ते अ‍ॅडल्ट कंटेंटसाठी ग्रुप किंवा गट तयार करतील त्यांना सेटिंगमध्ये याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. या संदर्भातील स्क्रिनशॉट Daniel Buchuk यांनी शेअर केला असून ते अ‍ॅप्सचे डेव्हलपमेंट ट्रॅक करण्याचे काम करतात. जर युझर्सने अशा प्रकारची सेटिंग केली तर त्यानंतर संबंधित कंटेंटवर अ‍ॅडल्ट कंटेंटचे लेबल दिसणार आहे.

Daniel Buchuk यांनी शेअर केलेल्या स्क्रिनशॉटनुसार, जे युझर्स त्यांच्या संबंधित कंटेंटवर अ‍ॅडल्ट लेबल लावणार नाहीत, त्यांचा कंटेंट फिल्टर केला जाईल. एवढच नव्हे तर एक्सवरून अशा प्रकारचा कंटेंट काढून टाकला जाऊ शकतो.

एक्सवर या प्रकारचे ग्रुप्स हे प्रायव्हेट ठेवले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त सोशल मीडिया नेटवर्क या ग्रुप्ससाठी व्हेरिफिकेशनची प्रक्रिया देखील जोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अ‍ॅडल्ट कंटेंट सगळ्यांना नाही दिसणार

एक्सच्या पॉलिसीनुसार, हा अ‍ॅडल्ट कंटेंट ग्राफिक मीडिया, एडल्ट न्यूडिटी आणि सेक्शुअल कंटेंट १८ वर्षांच्या आतील व्यक्तींसाठी रिस्ट्रिक्ट करण्यात आला आहे. शिवाय, जे युझर्स त्यांच्या प्रोफाईलमध्ये त्यांची  जन्मतारीख नमूद करणार नाहीत, त्यांना या प्रकारचा अ‍ॅडल्ट कंटेंट दिसणार नाही.

थोडक्यात ज्या युझर्सने त्यांची जन्मतारीख प्रोफाईलमध्ये नमूद करून त्यांचे वय किती हे कन्फर्म केले आहे, त्यांनाच या प्रकारचा कंटेंट दिसणार आहे. परंतु, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

X Upcoming Feature
X Premium : इलॉन मस्कने दिली आनंदाची बातमी; आता 'एक्स'चे प्रीमियम प्लस फीचर्स मिळणार अगदी मोफत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com