WhatsApp वर फक्त 'Hi' पाठवा आणि घरबसल्या मिळवा PF पासबुक; EPFO ची नवीन डिजिटल सुविधा सुरू!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या 74 व्या स्थापना दिनानिमित्त कोट्यवधी सभासदांसाठी अधिकृत व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे...
Download EPF Passbook & Check Balance via WhatsApp EPFO Guide

Download EPF Passbook & Check Balance via WhatsApp: EPFO Guide

esakal 

Updated on: 

EPFO WhatsApp Service: नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त (१ नोव्हेंबर २०२६) देशातील कोट्यवधी सभासदांसाठी एक अत्यंत सोयीस्कर डिजिटल सेवा सुरू केली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते या नव्या व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

या सुविधेमुळे आता पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी किंवा पासबुक डाउनलोड करण्यासाठी ईपीएफओच्या मुख्य पोर्टलवर वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपली आहे. सर्व्हर डाऊन किंवा तांत्रिक समस्यांमुळे पोर्टल चालत नाही अशा त्रासातून सभासदांची सुटका होणार आहे.

Loading content, please wait...