2026 पर्यंत 10 पैकी 4 लोकांकडे असेल 5G कनेक्टिव्हीटी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

जगातील 15 टक्के लोकसंख्या 5G कनेक्टीव्हीटीच्या एरियात राहत असेल.

नवी दिल्ली : Ericsson ने आपल्या लेटेस्ट Ericsson Mobility चा रिपोर्ट जाहीर केला आहे. या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलंय की 2026 पर्यंत 10 पैकी 4 लोकांच्या स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिव्हीटी असेल. याशिवाय या रिपोर्टमध्ये हे देखील सांगितलं गेलंय की यावर्षी म्हणजेच 2020 च्या अखेरपर्यंत 1 बिलियन म्हणजे 100 कोटीहून अधिक लोकांकडे 5G कव्हरेज असेल. 

जगातील 15 टक्के लोकांकडे असेल 5G नेटवर्क
या रिपोर्टनुसार, 100 कोटी म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के लोकांकडे 5G कव्हरेजचे एक्सेस असेल. याचा अर्थ असा नाहीये की 100 कोटी लोक 5G कनेक्टीव्हीटीचा वापर करत असतील तर याचा अर्थ असाय की 2020 पर्यंत जगातील 15 टक्के लोकसंख्या 5G कनेक्टीव्हीटीच्या एरियात राहत असेल. 

हेही वाचा - सनरूफ : नक्की असते तरी कशासाठी.!​
2026 पर्यंत 60 टक्के लोकांकडे 5G नेटवर्क
रिपोर्टमध्ये हा देखील दावा केला गेलाय की, 2026 वर्षापर्यंत 60 टक्के लोक 5G कव्हरेज एरियामध्ये राहतील. तर यावेळेपर्यंत 5G सब्सक्रिप्शन 3.5 बिलियन म्हणजेच 350 कोटीपर्यंत पोहोचू शकते.

हेही वाचा - व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक Reliance Jio कडे; यावर्षी जोडले 9 कोटी सब्सक्राईबर्स​
भारतात किती लोकांकडे आहे 5G?
एरिक्सनच्या रिपोर्टनुसार, भारतात 2026 पर्यंत एकूण स्मार्टफोन युझर्समध्ये 27 टक्के लोकांकडे 5G सब्सक्रिप्शन असेल. म्हणजेच 6 वर्षांनंतर देखील भारतात LTE नेटवर्कचाच ताबा राहिल. जवळपास 63 टक्के युझर्सजवळ LTE नेटवर्क सब्सक्रिप्शन असेल. भारतात गेल्या काही काळापासून वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेटच्या वापरामध्ये खुपच वाढ झालीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ericsson report says over 1 billion people will have 5g connectivity by the end of 2020