भारतात प्रीपेड प्लॅन महागल्याने फेसबुकला बसला फटका| Facebook | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

facebook reported decline in daily active users for first time loses 1 million daily users marathi news

भारतात प्रीपेड प्लॅन महागल्याने फेसबुकला बसला फटका

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड डेटाच्या किमती वाढवल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड डेटाच्या दरात तब्बल २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. या वाढीचा फटका फेसबुकला बसला आहे. २०२१ च्या चौथ्या तिमाहीत फेसबुकच्या (Facebook) देशातील एकूण वाढीला फटका बसल्याचे कंपनीने सांगितले आहे. (Expensive prepaid plans hit Facebook in India)

आशिया-पॅसिफिक आणि उर्वरित जगामध्ये कोरोनानंतर वापरकर्त्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, भारतात डेटा पॅकच्या किमतीत वाढ झाल्याने वापरकर्त्यांची वाढही मर्यादित राहिली. चौथ्या तिमाहीत फेसबुक (Facebook) वापरकर्त्यांच्या वाढीवर परिणाम झाल्याचे मेटा सीएफओ डेव्ह वेहनर यांनी कंपनीच्या तिमाही कमाईची माहिती देताना बुधवारी उशिरा सांगितले.

हेही वाचा: बाललैंगिक अत्याचार प्रकरणी बारामतीत एकाला तीन वर्षे सश्रम कारावास

एअरटेल (Bharti Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) प्रीपेड टॅरिफ दरांमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर एअरटेलने प्रीपेड टॅरिफ दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढवले ​​जातील असे सांगितले होते. २६ नोव्हेंबरपासून व्होडाफोन आयडियाने देखील दर २५ टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत. याचा फटका फेसबुकला बसला आहे.

प्रीपेड डेटा दरवाढीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परिणाम झाला आणि फेसबुकला त्याचा फटका बसला, असे काउंटरपॉइंट रिसर्च डायरेक्टर तरुण पाठक म्हणाले. भारतात लाखो प्रीपेड वापरकर्ते आहेत. नवीन वापरकर्ते झपाट्याने वाढत आहे. प्रीपेड किमतीच्या वाढीनंतर सोशल मीडियाचा वापर कमी झाला. ज्यामुळे फेसबुकच्या (Facebook) वाढीवर परिणाम झाला, असे तरुण पाठक यांनी IANS यांना सांगितले.

हेही वाचा: माझे लग्न गरीब घरात का केले? मुलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट

भारतात ३५० दशलक्ष फेसबुक वापरकर्ते

एकट्या भारतात ३५० दशलक्ष फेसबुक वापरकर्ते आहेत. यामुळे त्याच्यासाठी भारत आघाडीचा देश आहे. मेटा मालकीच्या व्हॉट्सॲपचे देशात ४०० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. फेसबुकने (Facebook) जागतिक स्तरावर दैनंदिन वापरकर्ते पहिल्यांदाच गमावले आहे. त्यांनी अपेक्षेपेक्षा कमी जाहिरात वाढ नोंदवली आहे. ज्यामुळे त्याचा स्टॉक सुमारे २० टक्क्यांनी घसरले आहे. मोठ्या प्रमाणात स्टॉक घटल्याने त्याचे बाजार मूल्य अंदाजे २०० अब्जानी कमी झाले आहे. कंपनीने पुष्टी केली की आहे की, ही त्याच्या इतिहासातील पहिली अनुक्रमिक घट आहे.

Web Title: Expensive Prepaid Plans Loss In Facebook In India Bharti Airtel Reliance Jio Vodafone Idea

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top