आता डेस्कटॉपवरूनही फेसबुक लाइव्ह

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

न्यूयॉर्क  : फेसबुकच्या लाइव्ह फीचरला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर सध्या मोबाईलवर उपलब्ध असलेले हे फीचर डेस्कटॉपवर उपलब्ध करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे.

फेसबुक लाइव्ह या फीचरद्वारे अनेक सेलिब्रेटीजनी याचा वापर केला आहे, याची वाढती लोकप्रियता पाहता हा निर्णय घेतल्याचे समजते.

मोबाईलवर येणाऱ्या अनेक अडचणी डेस्कटॉपमुळे कमी होतील, असे बोलले जात आहे. स्थिर कॅमेरा आणि उत्कृष्ट आवाजासह पटापट येणाऱ्या कमेंट्‌सना उत्तर देण्यासाठी लोकांना डेस्कटॉप फायदेशीर ठरणार असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. तसेच फेसबुक पेज असलेल्यांना या सुविधेचा विशेष लाभ होणार आहे. तसेच यामुळे लाइव्हमधील सुरक्षितता आणि गुणवत्ता दोन्हीही वाढणार असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.

Web Title: facebook live on desktop