
गेल्या आठवड्यात फेसबुकच्या मालकीचं असलेल्या व्हॉटसअॅपने त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीत बदल केला आहे. त्यानंतर फेसबुकनेही काही बदल केले आहेत.
नवी दिल्ली - सोशल मीडिया अॅप्स सातत्याने काही ना काही अपडेट करत असतात. गेल्या आठवड्यात फेसबुकच्या मालकीचं असलेल्या व्हॉटसअॅपने त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीत बदल केला आहे. त्यानंतर फेसबुकनेही काही बदल केले आहेत. फेसबुकने केलेला हा बदल मोठा आहे. आता पब्लिक पेजला असलेलं Like बटण काढून टाकलं आहे.
फेसबुकने फेमस व्यक्ती, कलाकार, खेळाडू, नेते, संस्था किंवा ब्रँडच्या पब्लिक पेजच्या डिझाइनमध्ये बदल केला आहे. नव्या डिझाइनमधून Like बटण हटवण्यात आलं आहे. फेसबुकने Like बटण काढून टाकल्यानं आता पेजवर फक्त फॉलोअर्स दिसणार आहेत. तसंच त्यामध्ये एक स्वतंत्र न्यूज फिड असेल. यात कन्व्हर्सेशनमध्ये युजर्सना भाग घेता येईल.
हे वाचा - डोन्ट वरी, आता WhatsApp मधल्या तुमच्या विशिष्ट खाजगी चॅटला असे लावा लॉक
फेसबुकवर युजर्सना पेज लाइक आणि फॉलो करण्यासाठी पर्याय दिले जात होते. मात्र अपडेट केल्यानंतर फक्त फॉलो हा एकच पर्याय असेल. फक्त पेजपुरताच हा बदल मर्यादित असून पोस्टला लाइक करण्यासाठीचं बटण कायम असणार आहे असंही कंपनीच्यावतीने सांगण्यात आलं आहे.
हे वाचा - Agree Or Not Now; तुम्हालाही Whatsapp नोटिफिकेशन आलंय का?
लाइक बटण हटवण्याचं कारण एका ब्लॉगमधून फेसबुकने सांगितलं आहे. पब्लिक पेजवर असलेल्या कंटेंटची क्वालिटी सुधारेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. फॉलोअर्सना त्याना आवडत असलेल्या पेजला कनेक्ट होणं सोपं होईल आणि त्यांना हव्या असलेल्या पेजचाच कंटेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवता यावा हा हेतू असल्याचं फेसबुकने एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. फेसबुकने त्यांच्या नव्या अपडेटची माहिती ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे.