Agree Or Not Now; तुम्हालाही Whatsapp नोटिफिकेशन आलंय का?

whatsapp update new policy
whatsapp update new policy

नवी दिल्ली - नव्या वर्षात व्हॉटसअ‍ॅप वापरायचं असेल तर युजर्सना त्यांच्या अटी स्वीकाराव्या लागतील. व्हॉटसअ‍ॅपकडून सध्या सर्व युजर्सना एक नोटिफिकेशन पाठवलं जात आहे. त्यामध्ये काही अटी असून त्या स्वीकारल्या नाहीत तर 8 फेब्रुवारी 2021 पासून तुम्ही त्याचा वापर करू शकणार नाही असं म्हटलं आहे. यामध्ये तुम्हाला सध्या Agree आणि Not Now असे पर्याय आहेत. मंगळवारपासून भारतातील युजर्सना हे नोटिफिकेशन पाठवलं जात आहे. व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या अटी 8 फेब्रुवारीपासून लागू होतील. सध्या हे हळू हळू रोलआउट केलं जात आहे. 

व्हॉटसअ‍ॅप अकाउंट सुरु ठेवायचं असेल तर नवीन पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करावी लागेल. सध्या युजर्सना Not Now पर्याय असला तरी तो 8 फेब्रुवारीपर्यंतच दिसेल. त्यावेळेपर्यंत जर नियम मान्य केले नाहीत तर अकाउंट डिलिट करावं लागेल. 

व्हॉटसअ‍ॅपने त्याच्या अपडेट पॉलिसीमध्ये कंपनीला तुम्ही जी परवानगी देता त्याबाबत सांगितलं आहे. यात म्हटलं आहे की, आमची सर्विस वापरण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपला जो कंटेंट तुम्ही अपलोड करता, सबमिट, स्टोअर किंवा सेंड, रिसिव्ह करता त्याला पुन्हा वापरण्यास, डिस्ट्रिब्यूट आणि डिस्प्ले करण्यासाठी जगभरातील नॉन एक्स्लूझिव्ह, रॉयल्टी फ्री तसंच हस्तांतरणासाठी परवानगी देते. दरम्यान, चॅटिंग आणि त्यात पाठवण्यात आलेला डेटा एंड टू एंड इन्क्रिप्टेड असणार आहे. तो फक्त संबंधित युजर्सनाच दिसेल आणि सेव्ह केला जाणार नाही. 

कंपनी तुमची कोणती माहिती गोळा करते याबद्दलही पॉलिसीमध्ये सांगण्यात आलं आहे. व्हॉटसअ‍ॅपवर तुमच्या सर्व अ‍ॅक्टिव्हीटींची माहिती सेव्ह केली जाते. यामध्ये सर्विस रिलेटेड आणि परफॉर्मन्सची माहिती असते. तसंच तुम्ही केलेलं प्रायव्हसी सेटिंग, तुम्ही इतरांशी कसे संवाद साधता. यामध्ये बिझनेसशी संबंधित माहितीचाही समावेश असतो. तसंच किती वेळा, किती काळ वापर करता हेसुद्धा पाहिलं जातं. याशिवाय व्हॉटसअ‍ॅपची चॅटिंग, कॉल, स्टेटस, ग्रुप अ‍ॅक्टिव्हीटीही सेव्ह केली जाते. ग्रुपची नावे, प्रोफाइल फोटो, ग्रुप डिस्क्रिप्शन इत्यादी माहिती सेव्ह होते. 

कंपनीने म्हटलं आहे की, युजर्सने अ‍ॅपचा वापरा कधीपासून सुरू केला. त्याच्या मोबाइल डिव्हाइसचे डिटेल्स, आयपी अ‍ॅड्रेस तसंच युजरने जी माहिती वापरण्यासाठी परवानगी दिली आहे ती माहिती फेसबुक आणि कंपनीसोबत शेअर केली जाते.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com