Facebook Reels : सुरू झालं फेसबुकचं Reel वर्ल्ड! मेटाचं नवं फीचर; आता सर्व व्हिडिओ फक्त रील फॉरमॅटमध्ये, कसं वापराल? पाहा

Facebook Reels Format New Feature : फेसबुकवर मोठा बदल आता सर्व व्हिडिओ फक्त Reels फॉरमॅटमध्येच अपलोड होतील.
Facebook Reels Format New Feature
Facebook Reels Format New Featureesakal
Updated on

Facebook Reels Feature : सोशल मीडिया विश्वात मोठा बदल घडवणारा निर्णय मेटाने घेतला आहे. फेसबुकवरील व्हिडिओ शेअरिंग पद्धतीत मोठा बदल करत आता सर्व व्हिडिओ फक्त Reels फॉरमॅटमध्येच अपलोड होतील. पारंपरिक व्हिडिओ पोस्ट्सचा जमाना संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. लवकरच हा नवीन बदल जगभरात लागू होणार असून यामुळे फेसबुकवरील व्हिडिओ अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.

यापुढे फेसबुक वर कुठलाही व्हिडिओ अपलोड करताना तो Reel स्वरूपातच दाखवला जाईल मग तो लहान असो किंवा मोठा. आतापर्यंत वापरकर्त्यांना पारंपरिक व्हिडिओ आणि Reels या दोन प्रकारांत निवड करता येत होती. मात्र आता मेटाने ही फरकाची रेषा पूर्णपणे मिटवली आहे. सर्व व्हिडिओसाठी एकाच प्रकारचे एडिटिंग टूल, अपलोडिंग प्रणाली आणि प्रायव्हसी सेटिंग्ज लागू होतील.

मोठे व्हिडिओ आणि हॉरिझोंटल फॉरमॅटही Reelsमध्ये

Reels म्हटलं की लहान आणि उभे (व्हर्टिकल) व्हिडिओ हे समीकरण होते, पण आता ते बदलत आहे. मेटा या अपडेटद्वारे लांब आणि आडवे (हॉरिझोंटल) व्हिडिओ देखील Reels स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा देणार आहे. यामुळे व्हिडिओ कंटेंट तयार करणाऱ्या क्रिएटर्सना अधिक मोकळीक मिळेल आणि प्रेक्षकांनाही अधिक वैविध्यपूर्ण अनुभव घेता येईल.

Facebook Reels Format New Feature
Vi New Service : आता इंटरनेट नसतानाही करता येणार ऑडिओ अन् व्हिडिओ कॉल; 'या' बड्या कंपनीने सुरू केली जबरदस्त ऑफर..

प्रायव्हसी आणि कंट्रोल अधिक सोपं

या नव्या प्रणालीत फेसबुकवरील Feed पोस्ट्स आणि Reelsसाठी प्रेक्षक निवड सेटिंग्ज एकत्र केली जाणार आहेत. म्हणजेच वापरकर्त्याने कोणता व्हिडिओ कोणाला दाखवायचा आहे मित्र, खास ग्रुप किंवा सर्वसामान्य लोक हे ठरवणं अधिक सोपं होईल. नवीन सिस्टम लागू होताच युजर्सना आपली प्रायव्हसी सेटिंग्ज तपासण्याचा किंवा बदलण्याचा संदेशही मिळेल.

क्रिएटर्ससाठी खास फायदे

क्रिएटर्ससाठी ही मोठी संधी आहे. नव्या अपडेटनंतर फेसबुक अ‍ॅपमधूनच संगीत, इफेक्ट्स, फिल्टर्स आणि टेम्पलेट्ससह अत्याधुनिक एडिटिंग टूल्स वापरता येतील. यामुळे कंटेंट अधिक प्रोफेशनल आणि आकर्षक बनवणे शक्य होईल.

Facebook Reels Format New Feature
Whatsapp ChatGPT : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले ChatGPT; झाली नव्या फीचरची एंट्री, वापरा 'या' 3 स्टेप्समध्ये..

जुना व्हिडिओ कंटेंट राहणार सुरक्षित

महत्त्वाचं म्हणजे, याआधी अपलोड केलेले पारंपरिक व्हिडिओ फेसबुक प्रोफाइल आणि पेजेसवर आहे तसेच राहतील. त्यात काहीही बदल होणार नाही. हे व्हिडिओ प्रेक्षकांसाठी पाहण्यास उपलब्ध राहतील, तसेच त्यांचा वितरित करण्याचा हक्क क्रिएटर्सना राहील.

फेसबुकवरील Video Tab आता Reels Tab म्हणून ओळखला जाईल. नावात बदल असला तरी व्हिडिओ शिफारसी (recommendations) वैयक्तिक आवडी आणि वापराच्या सवयींवर आधारितच असतील, असं मेटाने स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात, मेटाचा हा निर्णय सोशल मिडियावरील व्हिडिओ अनुभवात आमूलाग्र बदल घडवणार आहे. Reelsचा व्यापक वापर आणि अधिक सुलभ साधनांमुळे फेसबुकवरचा कंटेंट आणखी आकर्षक, प्रभावी आणि क्रिएटिव होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com