Vi New Service : आता इंटरनेट नसतानाही करता येणार ऑडिओ अन् व्हिडिओ कॉल; 'या' बड्या कंपनीने सुरू केली जबरदस्त ऑफर..

Vodafone Idea AST SpaceMobile satellite mobile services India : आता नेटवर्क नसतानाही व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करता येणार, ही क्रांतीकारक सेवा लवकरच सुरू होणार आहे. ते कसे जाणून घ्या
Vodafone Idea AST SpaceMobile satellite mobile services India
Vodafone Idea AST SpaceMobile satellite mobile services Indiaesakal
Updated on

देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) ने अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी AST SpaceMobile सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीमुळे आता भारतात लवकरच असा काळ येणार आहे, जेव्हा सामान्य स्मार्टफोनद्वारे नेटवर्क नसतानाही थेट अंतराळातून 4G आणि 5G सेवा वापरता येणार आहेत.

स्मार्टफोन थेट उपग्रहाशी जोडणार
Vi आणि AST SpaceMobile यांच्यातील ही भागीदारी भारतातील दुर्गम, नेटवर्क नसलेल्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल मानली जात आहे. AST SpaceMobile एक अद्वितीय ‘स्पेस-बेस्ड सेल्युलर ब्रॉडबँड नेटवर्क’ तयार करत आहे, जे कोणतेही विशेष उपकरण न वापरता थेट सामान्य स्मार्टफोनवर वापरता होईल.

Vi च्या म्हणण्यानुसार, ही सेवा केवळ ग्राहकांसाठीच नव्हे, तर शासकीय वापरासाठीदेखील उपयुक्त ठरणार आहे. कंपनीने यास "भारताच्या कनेक्टिव्हिटी क्षेत्रातील क्रांतिकारी बदल" असे म्हणाले आहे.

Vodafone Idea AST SpaceMobile satellite mobile services India
Shubhanshu Shukla : अंतराळवीर शुभांशु शुक्लाचं स्पेस मिशन पुन्हा लांबणीवर; उड्डाणाला उशीर होण्यामागं काय आहे कारण?

पहिला यशस्वी कॉल अंतराळातून
AST SpaceMobile ने याआधी जगात प्रथमच स्पेसमधून एक सामान्य मोबाईल फोनवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करण्यात यश मिळवलं आहे. कंपनीने जून 2023 मध्ये 10 Mbps पेक्षा अधिक वेगाने 4G डाउनलोड स्पीड प्राप्त केला होता आणि सप्टेंबर 2023 मध्ये पहिला 5G व्हॉईस कॉलही केला होता.

2024 मध्ये AST SpaceMobile ला AT&T, Verizon, Google आणि Vodafone सारख्या दिग्गज कंपन्यांकडून गुंतवणूक मिळाली असून अमेरिकन सरकारकडून देखील काही करार मिळाले आहेत.

Vodafone Idea AST SpaceMobile satellite mobile services India
Vivo T4 Ultra 5G मोबाईलची भारतात विक्री सुरू; पहिल्या दिवसापासूनच बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स अन् ऑफर एकदा बघाच

Vi आणि AST SpaceMobile यांचं म्हणणं आहे की, भारतासारख्या मोठ्या देशामध्ये ह्या तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष उपयोगितेचं दर्शन घडवण्यासाठी उत्तम संधी आहे. "स्पेसमधून थेट कनेक्ट होणारी ही तंत्रज्ञानक्रांती भारताच्या दूरसंचार सेवेला नवी दिशा देईल," असं AST च्या अधिकाऱ्याने सांगितलं.

ही सेवा सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र Vi च्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की योग्य वेळी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली जाईल.
दुसरीकडे, इलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीचा उपक्रम Starlink देखील भारतात उपग्रह इंटरनेट सेवा देण्याच्या तयारीत आहे. त्यांनी Reliance Jio आणि Bharti Airtel सोबत आधीच करार केले आहेत. याच महिन्यात Starlink ला भारतात सेवा देण्यासाठी अधिकृत परवाना मिळालेला आहे.

Vodafone Idea AST SpaceMobile satellite mobile services India
Whatsapp ChatGPT : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले ChatGPT; झाली नव्या फीचरची एंट्री, वापरा 'या' 3 स्टेप्समध्ये..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com