esakal | Fact Check : ऑनलाइन शिक्षणासाठी केंद्र सरकार पुरवणार मोफत इंटरनेट?
sakal

बोलून बातमी शोधा

Now connect smartphones without internet and network by google app

ऑनलाइन शिक्षणासाठी केंद्र सरकार पुरवणार मोफत इंटरनेट?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्याच्या काळामध्ये इंटरनेट (internet) खूप महत्त्वाची गोष्ट झाली आहे. केवळ करमणुकीचं साधन इथपर्यंतच त्याचा वापर मर्यादित राहिलं नसून माहितीचा स्त्रोत म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक जणांना वर्क फ्रॉम होम करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासत आहे. यामध्येच सोशल मीडियावर केंद्र सरकार युजर्सला मोफत इंटरनेट सेवा पुरवणार असा मेसेज व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे अनेक जणांनी या मेसेजची सत्यता न पडताळता तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला आहे. मात्र, पीआयबीने(PIB) या व्हायरल मेसेजची सत्यता पडताळली असून खरी परिस्थिती समोर आणली आहे. (fact-check-govt-giving-free-internet-to-jio-airtel-and-vi-users-for-3-months-truth-behind-whatsapp-msg)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यानुसार, केंद्र सरकार ३ महिन्यांसाठी १०० मिलिअन युजर्सला मोफत इंटरनेट सेवा पुरवणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या ऑनलाइन पद्धतीने मुलांना शिकवण्यात येत असल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, ही माहिती खोटी असून अफवांवर विश्वास ठेऊ नका असं पीआयबीने त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

हेही वाचा: आता इंटरनेट नसतानाही वापरू शकता WhatsApp

"फसवणुकीपासून सावधान! मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा आणि लिंक खोटी आहे. भारत सरकारने अशाप्रकारची कोणतीच घोषणा केलेली नाही. अशा फेक संकेतस्थळांपासून सतर्क रहा", असं ट्विट पीआयबीने केलं आहे.

काय आहे व्हायरल होणारा मेसेज?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये Jio, Airtel आणि VI या ग्राहकांना ३ महिने मोफत इंटरनेट सेवा पुरवली जाणार असल्याचं म्हटलं आहे. सध्या मुलांना ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यात येत असल्यामुळे त्यांच्यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरु केली असून ही ऑफर २९ जून २०२१ पर्यंत मर्यादित असल्याचं सांगण्यात आलं आहे.