First Cell Phone : तुम्हाला माहितीय का किलोभर वजन असलेल्या पहिल्या मोबाईलची किंमत किती होती?

मोबाईल बनवावा ही कल्पना कशी सुचली?
First Cell Phone
First Cell Phone esakal
Updated on

 First Cell Phone : आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात नाही. प्रत्येक कामासाठी स्मार्टफोन महत्त्वाचा झाला आहे. अगदी शॉपिंगपासून ते पैसे पाठवण्यासाठी, तसेच गेमिंगसाठी सर्वच ठिकाणी फोन उपयोगी येतो. 

पण हा फोन कोणी बनवला. जेव्हा तो बनवला तेव्हा त्याच वजन किती होतं? त्या मोबाईलला कितीवेळ चार्ज करावं लागायचं याबद्दल काही माहितीय का तुम्हाला?

 आज मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. लहान मुलापासून ते म्हातार्‍या व्यक्तीच्या हातात आहे आणि घड्याळाची टॉर्च, कॅल्क्युलेटर आणि पुस्तकांची जागा घेतली आहे.अशा या मोबाईल फोनबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात.

First Cell Phone
Phone Addiction : सतत फोन चेक करण्याची सवय आताच बदला नाहीतर तुमचा ब्रेन होणार असा डॅमेज

तुम्हाला आश्चर्य वाटेल की 50 वर्षांपूर्वी बनवलेल्या जगातील पहिल्या मोबाईलचे वजन 1.1 किलो होते. तुम्ही तुमच्यासोबत एक किलोपेक्षा जास्त वजनाचा फोन घेऊन जाऊ शकता का याची कल्पना करा. नुकतेच मोबाईलचा जन्म होऊन 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने जाणून घ्या त्याचा अप्रतिम प्रवास.

ज्याप्रमाणे कार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे काम करते, त्याच प्रकारे 1947 मध्ये कारच्या मदतीने एकमेकांशी बोलता येत होते. जरी हे तंत्रज्ञान फक्त श्रीमंतांसाठी उपलब्ध होते. नोकियाची उपकंपनी अमेरिकन कंपनी बेल लॅब्सने लँडलाइन फोनपासून मुक्ती मिळवण्यासाठी कार फोन नावाचा प्रयोग केला.

यासाठी कारमध्ये एक उपकरण बसवण्यात आले. 36 किलो वजनाचे हे उपकरण सेल्युलर टेलिफोन टॉवरच्या मदतीने चालत्या कारमध्ये बोलायचे. तंत्र चांगले होते पण त्यात काही तोटेही होते. कार फोनवर बोलण्यासाठी लाईन क्लिअर होण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागली.

असे होते पहिले फोन
असे होते पहिले फोनesakal
First Cell Phone
Boost Phone Signal : प्रवासात नेटवर्क झालं गुल! Don’t Worry, अशा टिप्सनी पुन्हा मिळवा नेटवर्क!

सेटअपबद्दल बोलायचे तर ते भारी आणि महाग होते. या कार फोनला फारसे यश मिळाले नाही. त्याच्या कमतरतेमुळे, ते बाजारात लोकप्रिय होऊ शकले नाही, परंतु त्याने अशा कल्पनेला जन्म दिला, ज्याशिवाय आजच्या क्षणाची कल्पना करणे देखील कठीण आहे.

कार फोननंतर आला मोबाईल

कार फोन नंतर मोबाईल आला. कार फोन ही संकल्पना प्रवासात बोलायची होती. माणसाला चालताना, बसता उठता बोलता येईल का? या कल्पनेवर मोटोरोलाचे मार्टिन कूपर आणि त्यांच्या टीमने एक छोटासा पोर्टेबल फोन बनवायला सुरुवात केली.

1972 मध्ये सुरू झालेल्या या मिशनला पूर्ण करण्यासाठी सुमारे 3 महिने लागले. तयार केलेल्या उपकरणाचे वजन 1.1 किलो होते आणि त्याला DYNATAC 800XI असे नाव देण्यात आले.

First Cell Phone
Sci-tech : सर्वात स्वस्त QLED

किंमत होती ८ लाख

मार्टिनच्या या यशस्वी प्रयोगानंतर सुमारे 10 वर्षे या कल्पनेवर काम करण्यात आले आणि सुमारे 800 कोटी रुपये खर्च करून 790 ग्रॅम वजनाचा मोबाइल तयार करण्यात आला. तो मोटोरोलाचा Daynatac मोबाईल होता. हा मोबाईल दिवसातून 10 तास चार्ज करायचा होता आणि त्यानंतर तुम्ही फक्त 35 मिनिटांसाठीच वापरू शकता.

या फोनची किंमत 10 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 8 लाख रुपये होती. यानंतर सतत मोबाईलच्या दुनियेत प्रयोग सुरू होते. नोकिया बाजारात आला आणि मोबाइलचा लूक, फीचर्स आणि पोर्टेबिलिटीवर वर्षानुवर्षे काम केले गेले.

First Cell Phone
Watch IPL in Mobile Free: इतिहासात पहिल्यांदा मोबाईल फोनवर फ्री पाहू शकता IPL, जाणून घ्या कुठे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com